Chandrashek Bawankule saam tv
देश विदेश

Maharashtra Politics: भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान.., अजित पवारांबाबत बोलताना चंद्रशेख बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Shivaji Kale

Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या काही दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. या निकालानंतर राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर लगेचच आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला रवाना गेले आहेत. यावेळी त्यांना अजित पवार यांच्या भाजपसोबत येण्याच्या चर्चांविषयी विचारले , तेव्हा त्यांनी भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही,असे म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश देव धर्माला मानणारा कोणीही आला तर त्याचे स्वागतच आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावं लागतं, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंना सत्तेचं व्यसन लागलं होतं - बावनकुळे

नागपूर येथील महाविकासाघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू झाल्यावर लोकं निघून गेले. जनतेला महाराष्ट्रा विकास पाहीजे. उद्धव ठाकरेंना सत्तेचं व्यसन लागलं होतं. त्यांना मुख्यमंत्री पदाचं व्यसन लागलं होतं म्हणून ते कांग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. (Latest Political News)

महाविकासघाडीवर पलटवार

तसेच, महाविकासआघाडीतील तिघांची विचारधारा काहीच नाही. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हाच त्यांचा उद्देश आहे. महाराष्ट्राचा सत्यानाश करण्याचा यांचा विचार आहे, असा पलटवार बावनकुळे यांनी महाविकासआघाडीच्या नागपूर येथील सभेवर बोलताना केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

SCROLL FOR NEXT