Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली! भाजपचे 2 मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली! भाजपचे 2 मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना
Maharashtra political crisis
Maharashtra political crisisSAAM TV
Published On

Maharashtra political crisis : राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान अजित पवार यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता. परंतु ते अद्याप मुंबईतच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra political crisis
Ajit Pawar News: अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द; कारण गुलदस्त्यात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक मोठ्या हालचाली सुरू आहेत. पंरतु पडद्यामागच्या या हालचाली एवढ्या मोठ्या राजकीय गोंधळात लपून राहिलेल्या नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या नेत्यांच्या तोंडून या हलचालींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खुलासा होत आहे. रविवारी संजय राऊत यांनी सामनाच्या रोकठोकमधून राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपसोबत जाऊ शकतात असा खुलासा केला होता.

उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत काय झालं हे राउतांनी सांगितले होते. "कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न. पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही", असे पवार म्हण्याल्याचे राऊतांनी म्हटले. (Maharashtra Politics)

Maharashtra political crisis
Sanjay Raut News: 'सरकारने राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बळी गेले', संजय राऊतांचा गंभीर आरोप

राउतांच्या या दाव्यानंतर काही मीडिया रिपोर्टमध्ये अजित पवार सत्तास्थापनेसाठी तयार असल्याचा दावा केला गेला. यासाठी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 35-40 आमदारही जाणार असल्याचा देखील दावा केला जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच आज अजित पवारांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याने आणि भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com