Shiv Sena And NCP MLA Disqualification Case  Saam Tv
देश विदेश

Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज महत्वाची सुनावणी, कोर्टात काय घडणार?

Shivsena And NCP MLA Disqualification Case: शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे.

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुनील प्रभू यांच्याद्वारे याचिका दाखल केली होती.

तर दुसरीकडे अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांच्याद्वारे याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून फक्त तारखा पडत असून सविस्तर सुनावणी झालेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं म्हणण आहे की याची सुनावणी मुंबई हायकोर्टात घ्यावी. मात्र मुख्य न्यायमूर्ती यांनी ही सुनावणी सुप्रीम कोर्टात होईल असे संकेत यापूर्वी दिलेले आहेत.

कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवून कागदपत्र मागवली होती. यासोबतच अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना देखील नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं. शिवसेना प्रकरणाची कागदपत्र सादर झाली असून त्यावर फक्त युक्तीवाद बाकी आहे. आजच्या सुनावणीवेळी तरी कोर्ट युक्तिवादाला सुरुवात करत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारताचे सरन्यायधीश डी वाय चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ ला सेवानिवृत्त होणार आहेत. ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी ही सुनावणी संपवणे महत्वाचे असणार आहे. १० नोव्हेंबरला रविवार असल्याने चंद्रचूड यांचा सेवानिवृत्ती दिवस 8 नोव्हेंबर असणार आहे. चंद्रचूड यांच्या पिठासमोर महाराष्ट्राच्या महत्वाच्या २ सुनावण्या आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी बाकी आहे. तसंच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपत्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवरील सुनावणी बाकी आहे. या दोन्ही प्रकरणांचा निकाल ८ नोव्हेंबर पूर्वी लागणे अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT