Surat fire news 
देश विदेश

१० हजारांचा पगार अडकला; महाराष्ट्राच्या माणसाने २४ कोटींच्या मालाचा केला कोळसा, गुजरातच्या मालकाला शिकवला धडा

Surat fire news : सुरतमधील श्याम संगिनी कापड बाजारातील आगीत २४ कोटी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. १० हजार रुपयांच्या थकीत पगाराच्या वादातून आग लावल्याप्रकरणी धुळ्यातील ३३ वर्षीय विनोद साळवेला सुरत क्राईम ब्रँचने अटक केली.

Namdeo Kumbhar

Surat textile market : फक्त १० हजार रुपयांच्या पगारासाठी कोणी २४ कोटी रुपयांचा कोळसा करू शकतं? ऐकून विश्वास बसणार नाही, पण गुजरातमधील सुरतमध्ये असाच एक धक्कादायक आणि थरारक प्रकार घडला आहे. पगार अडकवल्याच्या रागातून एका कर्मचाऱ्याने मालकाचा काटा काढायचं ठरवलं. बदला घेण्यासाठी त्याने १५० रुपयांचं पेट्रोल आणलं आणि दुकानाबाहेर ठेवलेल्या कापडाच्या पार्सलला आग लावून पसार झाला. पण ही आग इतकी भडकली की, २४ कोटी रुपयांचं सामान जळून खाक झालं.

सुरत क्राईम ब्रँचने आरोपीला महाराष्ट्रातील धुळ्यातून बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे. १० हजार रुपयांच्या थकीत पगारासाठी त्याने हा भयंकर पराक्रम केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे. ९ सप्टेंबर रोजी सुरतच्या श्याम संगिनी कापड बाजारात भीषण आग लागली होती, त्यामध्ये २४ कोटी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. या आगीचे कारण त्या दुकानात काम करत होता तो कर्मचारी निघाला. त्याचा १०,००० रुपयांचा पगार थकीत होता, त्याने आपल्या मालकावर सूड उगवण्यासाठी आग लावली होती. पगार दिला नाहीच त्याशिवाय अपमानही केला होता असा दावा आरोपीने केला आहे.

सोमवारी पोलिसांनी महाराष्ट्रातील धुळ्याच्या ३३ वर्षीय विनोद साळवेला अटक केली. साळवे एप्रिल २०२६ पासून हनुमान प्रसाद जवार यांच्या दुकानात लेखापाल म्हणून काम करत होता. त्याला महिन्याला ३०,००० रुपयांचा पगार मिळत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, साळवेने सांगितले की, जवार आणि इतर लेखापालांनी त्याचा अपमान केला आणि त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे त्याने नोकरी सोडली. साळवेने असेही सांगितले की, नोकरी सोडताना दुकानदाराने त्याच्या पगारातून १०,००० रुपये कापून घेतले होते.

चार व्यावसायिकांचा २४ कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला

९ सप्टेंबर रोजी जवार यांच्या दुकानाला साळवेने आग लावली. त्यावेळी बाजूलाच असणाऱ्या व्यावसायिकांच्या १७ दुकानांमधील २४ कोटी रुपयांच्या मालाचा कोळसा झाला. जवार यांचा दावा आहे की, त्यांना ६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना दुर्घटनेनंतर एक मास्क घातलेला व्यक्ती पळून जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने करत साळवेला अटक केली.

प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल आणले होते

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साळवेने ८ सप्टेंबर रोजी एका पंपावरून पेट्रोल खरेदी केले. तो एका प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल घेऊन दुकानात आला. मास्क घालून तो दुकानात चोरून शिरला. वस्तूंवर पेट्रोल ओतून त्यांना आग लावली. आग लावल्यानंतर तो घटनास्थळावरून वेगाने पळून गेला. अटकेनंतर साळवेने गुन्ह्याची कबुली दिली. तो म्हणाला की, पगारावरून झालेल्या वादाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हा गुन्हा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देवरीत आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा....

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघानं घडवला इतिहास; श्रीलंकेचा धुव्वा उडवत सुवर्णपदक जिंकलं

कोल्हापुरच्या बँकेत 40 लाखांचा घोटाळा; ग्राहकांच्या एफडीचे पैसे स्वतःच्या खात्यावर, ऑडिओ क्लिपनं फुटलं बिंग

Satbara : वडापावपेक्षा सातबारा स्वस्त! वाचा किंमत अन् डिजिटल 7/12 काढण्याची संपूर्ण प्रोसेस

Krishna Mukerji Passes Away: बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्धी अभिनेत्रीला मातृशोक

SCROLL FOR NEXT