Delhi Legislative Assembly Elections 2025 Sakal
देश विदेश

Delhi Election 2025 : जाट विरुद्ध जाट, गुर्जर विरुद्ध गुर्जर; महाराष्ट्राची रणनीती दिल्लीतही लागू

Delhi Legislative Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये एकाच समाजातील, जातीतील उमेदवार आमने-सामने होते. हीच रणनीती आता दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्येही वापरण्यात आली आहे.

Yash Shirke

Delhi Election 2025 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने एकाच समाजातले उमेदवार एकमेकांसमोर उभे केले होते. या रणनीतीमुळे विधानसभा २०२४ निवडणुका चर्चेत होती. हीच रणनीती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्येही वापरण्यात येत आहे. दिल्लीत जाट विरुद्ध जाट, गुर्जर विरुद्ध गुर्जर, गुप्ता विरुद्ध गुप्ता असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

दिल्लीत ठिकठिकाणी हिंदू विरुद्ध हिंदू, मुस्लीम विरुद्ध मुस्लीम असे सामने पाहायला मिळणार आहेत. दिल्लीत ५ मुस्लीम बहुसंख्या असलेल्या ठिकाणी काँग्रेस आणि आपकडून मुस्लीम धर्मीय उमेदवार आमने-सामने उभे करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी एआयएमआयएमनेही मुस्लीम धर्मीय उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

दिल्लीतील विधानसभेत १२ जागा एससी-एसटी समाजासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या १२ ठिकाणी काँग्रेस, आप आणि भाजप अशा तिन्हीही पक्षांनी एससी-एसटी समाजाचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून उभे केले आहेत. आंबेडकर नगर, गोकलपूर, बवाना अशा १२ जागांसाठी मोठ्या पक्षांनी जय्यत तयारी केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मागील दोन टर्मपासून दिल्लीचा गड आपने राखला आहे. पुढेही सत्ता टिकवण्यासाठी आम आदमी पार्टीने तयारी सुरु केली आहे. इंडिया आघाडीत एकत्र असलेले काँग्रेस आणि आप दिल्ली विधानसभेत एकमेकांच्या विरोधात आहेत. तर दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न होत आहेत. अशात दिल्लीची गादी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Tourism: हिरवागार निसर्ग आणि थंडगार वारा, नाशिकमधील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Blood Moon 2025: आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ब्लड मूनची अद्भुत दृश्यं पाहण्याची संधी

Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

SCROLL FOR NEXT