Bharat Bandh on November 2 for OBC caste census : जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असावा, या मागणीसाठी आता देशभरात तीव्र आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. २ नोव्हेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. याचा महाराष्ट्रातही परिणाम होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यास समाजाची अचूक आकडेवारी समोर येणार नाही, असा आक्रमक पवित्रा देशातील ओबीसी संघटनांनी घेतला आहे.
याच मागणीसाठी ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’च्या बॅनरखाली एका देशव्यापी आंदोलनाची रणनीती आखण्यात आली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून येत्या २ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वडेट्टीवार यांनी याबाबतची रूपरेषा कशी असेल, याची माहिती दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.
आंदोलनाचा टप्प्याटप्प्याने असणारा कार्यक्रम:
१२ ते १८ ऑक्टोबर या काळात देशातील खासदार आणि आमदारांना निवेदने देऊन हा मुद्दा संसदेत ताकदीने मांडण्याची मागणी केली जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लेखी निवेदने सादर केली जातील. २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा स्तरावर मोठे मोर्चे काढून निषेध नोंदवला जाईल. २ नोव्हेंबर सर्व मागण्यांसाठी देशभरात ‘भारत बंद’ पुकारला जाईल.
२ नोव्हेंबरला भारत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १५ नोव्हेंबरला दिल्ली येथे राष्ट्रपती आणि जनगणना आयोगाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त निवेदन देण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यांतील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली राष्ट्रीय समन्वय समितीही स्थापन करण्यात येणार आहे. ओबीसींची अचूक जनगणना व्हावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.