खूशखबर! रेल्वे चालवणार २ स्पेशल 'अमृत भारत' ट्रेन, कोणत्या स्थानकात थांबणार? जाणून घ्या टाईमटेबल

दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने उधना ते जयनगरदरम्यान दोन विशेष अमृत भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. १८, २०, २५ आणि २७ ऑक्टोबरच्या फेऱ्यांचे वेळापत्रक, ट्रेन क्रमांक, आगमन-प्रस्थानाच्या वेळा आणि प्रमुख थांबे जाणून घ्या.
Amrit Bharat Trains
Amrit Bharat Trains
Published On: 

सुरत आणि मधुबनी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वाढती गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता रेल्वेने या मार्गावर २ विशेष 'अमृत भारत' ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमध्ये एकूण ८ स्लीपर आणि ११ जनरल कोच असणार आहेत.

रेल्वेने गुजरातच्या उधना (सुरत) आणि बिहारच्या जयनगर (मधुबनी) दरम्यान दोन विशेष 'अमृत भारत' गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. दिवाळी आणि छट पूजा या सणांच्या काळात परराज्यातून घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने २ ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Amrit Bharat Trains
Sleep Talking : झोपेत बडबड करताय? 'या' भयानक आजाराची तर ही सुरुवात नाही ना? आधीच जाणून घ्या

पहिली ट्रेन -

उधना ते जयनगर (०९०७३): रविवार, १८ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९:५० वाजता उधना येथून सुटेल आणि मंगळवारी सकाळी ०५:३० वाजता जयनगरला पोहोचेल.

जयनगर ते उधना (०९०७४): मंगळवार, २० ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९:०० वाजता जयनगर येथून सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०७:३० वाजता उधना येथे पोहोचेल.

दुसरी ट्रेन -

उधना ते जयनगर (०९०७१): रविवार, १८ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३:४५ वाजता उधना येथून सुटेल आणि मंगळवारी सकाळी ११:३० वाजता जयनगरला पोहोचेल.

जयनगर ते उधना (०९०७२): मंगळवार, २० ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ०१:३० वाजता जयनगर येथून सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०८:३० वाजता उधना येथे पोहोचेल.

Amrit Bharat Trains
३५ वर्षीय अभिनेत्रीची देहविक्रीच्या रॅकेटमधून सुटका, ठाण्यातील घटनेनं इंडस्ट्रीत खळबळ

कोणत्या स्थानकात थांबणार ?

वडोदरा, रतलाम, नागदा, उज्जैन, संत हिरडाराम नगर, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, गोविंदपुरी, सुभेदारगंज, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, दानापूर, पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुबनी या रेल्वे स्टेशनवर थांबतील.

या गाड्या पूर्णपणे अनारक्षित (General/Unreserved) असतील. प्रवासासाठी आधीच आरक्षणाची गरज भासणार नाही. या गाड्यांमध्ये ८ स्लीपर, ११ जनरल (सामान्य), १ एसएलआरडी आणि १ पॅन्ट्री कार (खाण्यापिण्याची सोय असलेला डबा) असे एकूण २२ डबे असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com