FSSAI investigates food safety concerns after viral videos allegedly show contamination in Maggi and hygiene issues at KFC outlets. saam tv
देश विदेश

मॅगीच्या पाकिटात किडे? ब्रँडेड फूडचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Worms In Maggi Fssai Notice Nestle Kfc Food Safety: ब्रँडेड पॅकेज्ड फूड तुम्ही आवडीनं खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.... मॅगीच्या पाकिटात किडे असल्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच...त्यामुळे FSSAIनं 3 ब्रँडेड कंपन्यांना काय नोटीस दिलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

"तुम्ही खात असलेलं पॅकेज्ड फूड खरंच सुरक्षित आहे का? सुप्रसिद्ध ब्रँडच्या नावावर आपण जे अन्न डोळे झाकून विकत घेतो, ते आपल्या आरोग्याशी खेळ तर करत नाहीये ना? याचा विचार करायला लावणारा... धक्कादायक प्रकार समोर आलाय...सोशल मीडियावरील तक्रारींनंतर अन्न सुरक्षा नियामक संस्था म्हणजेच FSSAIनं 3 ब्रँडेड कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेनं दिलीय...मॅगी नूडल्स आणि खजूरमध्ये किडे आढळल्याचा, तर KFC मध्ये अस्वच्छतेबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हा बडगा उगारण्यात आलाय. तसंच FSSAI ने नेस्लेकडे संबंधित उत्पादनाचा सप्लायर कोण होता? त्या बॅचचा क्वालिटी चेक रिपोर्ट काय होता? आणि बाजारातून ही उत्पादने हटवण्यासाठी काय पावले उचलली? याचा सविस्तर 'अॅक्शन टेकन रिपोर्ट' मागवलाय...मात्र नेस्लेनं या आरोपाचं खंडन केलयं...

MAGGI'कडून आरोपांचं खंडन

​मॅगी नुडल्समध्ये कीटक किंवा अळ्या असल्याचा दावा करणाऱ्या एका असत्यापित सोशल मीडिया अकाउंटवरील आरोपांचे आम्ही स्पष्टपणे खंडन करतो. ​FSSAI द्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत सखोल चौकशीसाठी आम्ही संबंधित बॅच आणि बाजारातील नमुन्यांची गुणवत्ता तपासणी केली आहे. या तपासणी अहवालात कोणत्याही प्रकारचा कीटक किंवा अळ्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान ओपन सीक्रेट कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी KFCनं मात्र सहकार्याची भूमिका घेतली आहे...

KFC'ची प्रतिक्रिया

आम्ही नोटिशीतील आरोपांची सखोल चौकशी करून, FSSAIकडे आपली बाजू मांडू.

दरम्यान या बड्या ब्रँड्सनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळू नये, यासाठी FSSAI ने आता कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीयं..मात्र कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आणि जाहिरातींमधून गुणवत्तेचे दावे करणाऱ्या या कंपन्यांनी गुणवत्तेत कसर केली असल्यास मोठं सत्य समोर येईल... त्यामुळे FSSAI च्या तपासानंतर नेमकं काय सत्य बाहेर येतंय आणि या कंपन्यांवर काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT