Wife Assaults Husband Over iPhone Saam
देश विदेश

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Wife Assaults Husband Over iPhone: ग्वाल्हेरमध्ये पत्नीने पतीला आयफोन न दिल्यामुळे मारहाण केली. पत्नीने पतीला छतावरून ढकलल्यामुळे गंभीर दुखापत झाली, पाय फ्रॅक्चर झाला.

Bhagyashree Kamble

  • ग्वाल्हेरमध्ये पत्नीने पतीला आयफोन न दिल्यामुळे मारहाण केली.

  • पत्नीने पतीला छतावरून ढकलल्यामुळे गंभीर दुखापत झाली, पाय फ्रॅक्चर झाला.

  • पतीने पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून अधिक तपास चालू आहे.

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेनं तिच्या पतीला आयफोन न दिल्यानं मारहाण केली आहे. एवढंच नाही तर, आरोपी महिलेनं तिच्या पतीला छतावरून ढकलले. छतावरून पडल्यामुळे त्या तरूणाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा पायही फ्रॅक्चर झाला आहे. पतीने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

ग्वाल्हेरच्या ठाकूर मोहल्ला येथे राहणाऱ्या शिवम वंशकार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ग्वाल्हेरमध्ये ते खासगी नोकरी करत होते. त्यांचे २ वर्षांपु्र्वी झाशी येथील साधना नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून दोघांचे क्षुल्लक कारणावरून भांडणं होत. पत्नी कायम पतीकडे विविध मागण्या करीत होती. पतीनंही पत्नीचे सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

अलिकडेच पत्नीनं पतीकडे आयफोनची मागणी केली होती. मात्र, पतीला ही मागणी पूर्ण करण्यास कठीण वाटले. शिवमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. याकारणावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. पत्नी हट्टाला पेटली. घटनेच्या दिवशी पत्नी पतीला मारहाण करू लागली. नंतर शिवीगाळही केली.

नंतर पत्नीनं पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर, साधनाने शिवमला छतावरून खाली ढकलले. शिवम घराच्या छतावरून खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा पाय मोडला. पायाला फ्रॅक्चर करण्यात आलं. पत्नीच्या हट्टाच्या त्रासाला कंटाळून त्यानं पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांकडे पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. शिवमने पोलिसांना सांगितले की, पत्नी आणि भाऊ नेहमी खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत होते. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT