Shocking News  Saam tv
देश विदेश

Shocking News : विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकले, गुदमरून ८ जणांचा मृत्यू

Madhya Pradesh Well Tragedy : गंगौर विसर्जनासाठी विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या आठ जणांवर काळाने घाला घातला आहे. विषारी वायूमुळे मध्य प्रदेशमध्ये आठ जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केलाय.

Namdeo Kumbhar

Madhya Pradesh Well Tragedy : गंगौर विसर्जनासाठी विहिरीतील घाण साफ करण्यासाठी उतरलेल्या आठ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेले हे आठ जण गाळात अडकले आणि निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार, विहिरीतील विषारी वायू हे मृत्यूचे कारण ठरले आहे.

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात ही दु:खद घटना घडली. विहिरीतील विषारी वायूमुळे ८ जणांचा गुदमरून जीव गेल्याचा प्रथामिक अंदाज व्यक्त केला जातोय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले की, खंडवा जिल्ह्यातील एका विहिरीमध्ये विषारी वायूमुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गंगौर मातेचे विसर्जन परंपरेनुसार गावाच्या मध्यभागी असलेल्या या विहिरीमध्ये प्रत्येक वर्षी होते. त्यासाठी विहीर स्वच्छ करण्यासाठी ३ जण उतरले होते. ते तिघे गाळात अडकले अन् बुडू लागले. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी आणखी पाच जण आत उतरले. दुर्दैवाने आठही जणांचा विहिरीत गुदमरून मृत्यू झाला.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त -

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी खंडवा येथे घडलेल्या या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "खंडवा जिल्ह्यातील छैगांवमाखन परिसरातील कोंडावत गावात एका दुर्दैवी घटनेत गंगौर विसर्जनासाठी विहीर साफ करण्यासाठी उतरलेला एक व्यक्ती चिखलात अडकला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ एक आठ जण उतरले. पण त्या सर्वांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासन आणि SDERF च्या पथकाने संयुक्त बचाव कार्य सुरू केले."

४ लाखांची मदत -

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सर्व मृतांच्या नातेवाईकांना ४-४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. "दु:खाच्या या क्षणी कुटुंबीयांसोबत माझ्या मनापासून सहवेदना आहेत. सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना आहे की, सर्व पुण्यात्म्यांना आपल्या चरणी स्थान द्यावे आणि नातेवाईकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी, असे आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT