Ujjain Mahakal Temple Fire ANI
देश विदेश

Ujjain Temple Fire: उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी भीषण आग; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले, पाहा VIDEO

Ujjain Mahakal Temple Fire: उज्जैन येथील महाकाल मंदिरात भस्म आरती सुरु असताना अचानक मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग लागली. या आगीत पुजाऱ्यासह १३ जण होरपळले आहेत.

Satish Daud

Madhya Pradesh Ujjain Mahakal Temple Fire

मध्यप्रदेशच्या उज्जैन शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. महाकाल मंदिरात भस्म आरती सुरु असताना अचानक मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग लागली. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण होरपळले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन (Madhya Pradesh) येथील महाकाल मंदिरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भस्म आरती सुरू होती. या आरतीला शेकडो भाविक जमले होते. आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता.

याचदरम्यान मंदिराच्या गर्भगृहाला अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच भाविक धास्तावले. त्यांनी आरडाओरड सुरू करत मंदिराच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने मंदिरातील पुजाऱ्यासह १३ भाविक आगीत होरपळले. (Breaking Marathi News)

आगीची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीत जखमी झालेल्या १३ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जखमी भाविकांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीच्या घटनेमुळे लोक भाजले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून घटनेचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik- Akkalkot Expressway: नाशिक-अक्कलकोट फक्त ४ तासांत, सहा लेनचा सुपरहायवे, वाचा कसा असेल हा मार्ग

मोठी बातमी! आज आचारसंहिता लागणार, २९ महापालिका निवडणुकीची घोषणा होणार

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंच्या त्या 'सावली'ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे लोकार्पण सोहळा

गिरिजा ओक, गौतमी पाटील ते प्रणित मोरे; Bigg Boss Marathi 6 साठी कोणाच्या नावांची चर्चा

SCROLL FOR NEXT