Madhya Pradesh Crime News Saam TV
देश विदेश

Madhya Pradesh Crime News: जन्मदात्या आईचे क्रूर कृत्य! पोटच्या तीन लेकींची केली निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

Madhya Pradesh News: तिच्यावर एका मांत्रिकाकडे उपचार सुरू असल्याची माहिती तिच्या कुटूंबियाने सांगितली आहे.

Gangappa Pujari

Madhya Pradesh News: अंधश्रद्धेत बुडालेली व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याची अनेक उदाहरणे आपल्याला ऐकायला मिळत असतात. मात्र मध्यप्रदेशमधील एका घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. मध्यप्रदेशमध्ये जन्मदात्या आईनेच आपल्या तीन मुलींचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू. (Latest Marthi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातील श्यामपुरा येथे तीन लहान मुलींचे मृतदेह विहीरीत सापडले होते. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या तीन मुलांच्या मृत्यूचा तपास करताना समोर आलेल्या माहितीने पोलिसही हादरुन गेले आहेत. या मुलींची हत्या कुणी अन्य व्यक्तीने नाही तर त्यांच्याच आईने केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

ही महिला मुलींची हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून फरार झाली होती. दरम्यान, या महिलेला कशाची तरी बाधा झाली होती. तिच्यावर तांत्रिकाकडून उपचारही सुरू होते, असा दावा आता तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खिलेडी गावातील रहिवासी असलेली रंजना नावाची महिला तीन मुलींसह श्यामपुरा गावात विवाहात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती मुलींना आंबे तोडायचे आहेत, असं सांगून निघून गेली. संध्याकाळपर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा विहिरीजवळ एका मुलीचा मृतदेह सापडला.

त्यानंतर आजूबाजूला पाहिले असता आणखी दोन मुलींचे मृतदेह सापडले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर एका मांत्रिकाकडे उपचार सुरू असल्याची माहिती तिच्या कुटूंबियाने सांगितले आहे. तसेच तिची मानसिक स्थितीही ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अंधश्रद्धेतून आईनेच तीन मुलींचा जीव घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

SCROLL FOR NEXT