Shocking News  Saam Tv
देश विदेश

Shocking: गुप्तांगात मिरची पावडर टाकली, उलटं लटकून मारहाण; पोलिसांचे 4 तरुणांसोबत भयंकर कृत्य

Madhya Pradesh Police: मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी ४ तरुणांना पोलिस ठाण्यात बेदम मारहाण केली. गुन्हा कबूल न केल्यामुळे त्यांनी त्यांच्या गुप्तांगामध्ये मिरची पावडर टाकली. या घटनेमुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

Priya More

मध्य प्रदेशमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. ४ आदिवासी तरुणांना पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली बेदम मारहाण केली. नौगाव पोलिस ठाण्यात या चारही तरुणांना पोलिसांनी उलटं लटकवून बेदम मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा कबूल केला नाही त्यामुळे मारहाणीवर न थांबता पोलिसांनी या तरुणांच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली.

हे तरुण पोलिसांच्या तावडीतून सुटून बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांनी त्यांच्यासोबत केलेले भयंकर कृत्य सांगितले. या तरुणांनीएसपी ऑफिसबाहेर १० तास धरणे आंदोलन सुरू केले आणि पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश देत ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले.

शनिवारी रात्री उशिरा छतरपूरच्या एसपी कार्यालयाबाहेर लोकांनी न्यायासाठी याचना केली. पीडितांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांच्यावर चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दबाव आणला, परंतु जेव्हा या तरुणांनी गुन्हा कबूल केला नाही तेव्हा त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पीडित तरुणांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्यांना पट्ट्यांने आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांचे हात, पाय आणि पाठीवर मारहाण केल्याचे व्रण आहेत. पोलिसांनी त्यांच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली जेणेकरून आम्ही गुन्हा कबूल करू असा आरोप पीडित तरुणांनी केला आहे.

पोलिसांच्या वागणुकीला बळी पडलेल्या पीडितेच्या कुटुंबाने भीम आर्मीसोबत एसपी कार्यालयाबाहेर त्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांसह बसून निषेध केला. दुसरीकडे, पोलिसांवर गंभीर आरोप झाल्यानंतर विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. नौगावचे एसडीओपी अमित मेश्राम यांनी सांगितले आहे की चौकशीनंतर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : उत्तरे मिळायला हवीत! अजित पवार विमान अपघात अहवालावर जय पवार नाराज, स्पष्ट शब्दात म्हणाले...

Maharashtra Live News Update : खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

Raigad Tourism : अलिबागजवळील 'हा' सागरी किल्ला एकदा पाहाच, अरबी समुद्राच्या मनमोहक सौंदर्याच्या प्रेमात पडाल

Bigg Boss Marathi 6 : एक नव्हे 'बिग बॉस'मध्ये थेट ३ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री, घराचे तापमान वाढणार

Sanju Samson : गौतम गंभीरची गुगली! संजू सॅमसन नाही तर 'हा' खेळाडू आहे विजयाचा खरा शिल्पकार

SCROLL FOR NEXT