BJP Politics  Saam tv
देश विदेश

राज्यसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा बोलबाला; भाजपने मध्य प्रदेश- गुजरातमधील सर्व जागा जिंकल्या, काँग्रेसने कुठे किती जिंकल्या?

rajya sabha election result : राज्यसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा बोलबाला पाहायला मिळाला. भाजपने मध्य प्रदेश- गुजरातमधील सर्व जागा जिंकल्या आहेत.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मिनाक्षी नटराजन यांना कोर्टातही दिलासा मिळाला नाही

गुजरात-राजस्थानमध्ये भाजप वरचढ

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली. काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर राज्यसभेच्या तिसऱ्या जागेची लढत संपुष्टात आली. त्यामुळे मध्य प्रदेशातील तीन जागांवर भाजपनेच बाजी मारली. गुजरातमधील राज्यसभेच्या ४ जागा भाजपने जिंकलया. तर काँग्रेसने राजस्थानमधील एकमेव जागा जिंकली.

अर्ज प्रक्रियेदरम्यान भाजपने काँग्रेस उमेदवारावर दाखल गुन्हे लपवल्याचा आरोप केला. भाजपच्या आक्षेपानंतर काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर भाजपचे उमेदवार तरुण चुघ, रजनीश अग्रवाल आणि महेश केवट हे बिनविरोध निवडून आले. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी विजयाचं प्रमाणपत्र घेऊन राज्यसभेत पोहोचले.

मिनाक्षी नटराजन यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या अर्ज रद्द करण्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यानंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रशांत कुमार आणि न्यायाधीश अतुल एस चंदूरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने एका आदेशाचा हवाला देत कोर्टाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करू नसल्याचे म्हटलं आहे.

मिनाक्षी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद कोर्टात म्हटलं की, कोर्टाने निवडणूक होऊ द्यावी. तसेच तुमचा आदेश निकाल जाहीर करण्यापुरता मर्यादित ठेवण्यात यावा. परंतु कोर्टाने सिंघवी यांचा युक्तिवादही फेटाळून लावला'.

राजस्थान- गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपची बाजी

गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांवर भाजपचे चारही उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीत राजू शुक्ला, मानसिंग परमार, मुकेश रथवा आणि जितेंद्र कांजरिया हे विजयी झाले. राजस्थानमधील राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली. दोन जागांवर भाजपचे सतिश पुनिया आणि अलका गुर्जर यांनी बाजी मारली. तर काँग्रेसचे नीरज डांगी यांनी एक जागा जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj chavan: कॉलर उडवतं हटके स्टाईलमध्ये सुरज चव्हाणने दिली गुडन्यूज; म्हणाला, 'मी बाबा होणार...'

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सुनेत्रा पवार भावूक; दादांच्या आठवणींना उजाळा

चपातीचा शोध कोणी लावला असेल? तुम्हाला माहितीये का?

Crime News: फुटबॉलमध्ये करिअर घडवून देतो म्हणत जाळ्यात ओढलं; नंतर ३ वर्ष अत्याचार अन्..., १७ वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य

SCROLL FOR NEXT