Madhya Pradesh Accident News Saam TV
देश विदेश

Accident News: कार्यक्रम आटोपून परतत असताना बोलेरोचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

Madhya Pradesh Accident News: मध्य प्रदेशातील इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने बोलेरो कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

मध्य प्रदेशातील इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने बोलेरो कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

मृतांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल आणि एका महिलेसह ८ जणांचा समावेश आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक गुना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बुधवारी (ता. १५) ते कारने अलीराजपूरच्या बोरी गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते.

कार्यक्रम आटोपून परतत असताना रात्री उशिरा घाटबिलोड येथे अज्ञात कारला धडक दिली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी बचावकार्य केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून मृतदेह बेटमा रुग्णालयात आणण्यात आले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

SCROLL FOR NEXT