Dolphin Swimming Pool Madhya Pradesh Saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh News: स्विमिंग पूलमध्ये स्टंटबाजी जीवावर बेतली, पाण्यात पडला पण बाहेर आलाच नाही; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Dolphin Swimming Pool Madhya Pradesh: दुसऱ्या मुलाच्या चुकीमुळे कोणताही दोष नसताना अनिकेत तिवारीचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर अनिकेतला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

Priya More

मध्य प्रदेशमधील रतलाम शहरामध्ये एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणामुळे एका १८ वर्षांच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिकेत तिवारी असं या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना स्विमिंग पूलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुसऱ्या मुलाच्या चुकीमुळे कोणताही दोष नसताना अनिकेत तिवारीचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर अनिकेतला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

मध्य प्रदेशच्या डॉल्फिन स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या अनेक तरुणांमध्ये अनिकेतचाही समावेश होता. अनिकेत आपल्या मित्रांसोबत या स्विमिंग पूलमध्ये आला होता. अनिकेत स्विमिंग पूलमधून बाहेर येत असतानाच एका तरुणाने पूलमध्ये डाइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा पाय अनिकेतच्या डोक्याला जोरात लागला. हा धक्का इतका जोरदार होता की अनिकेत बेशुद्ध होऊन स्विमिंग पूलमध्ये पडला.

अनिकेतला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलच्या आसपास असलेले तरुण धावले. पण त्याला बाहेर काढण्यासाठी ६ मिनिटाचा कालावधी लागला. त्याला स्विमिंग पूलमधून बाहेर काढून मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ही संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा लाइफगार्ड तिथेच उपस्थित होते. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती पाहता पोहणाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अनिकेत पाण्यात पडल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी कोणताही लाइफगार्ड पुढे आला नाही. उलट हे लाइफगार्ड स्विमिंग पूलच्या कठड्याजवळ फिरत आणि एकमेकांशी बोलत असल्याचं दिसून आले. ही घटना घडल्यानंतर देखील स्विमिंग पूल मालकाने पूल बंद केला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्विमिंग पूल बंद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT