Cricket Match Heart Attack Death  Saam TV
देश विदेश

Shocking News: बॉलिंग करताना तरुण जागेवरच कोसळला; अवघ्या १० सेकंदातच मृत्यूने कवटाळलं, हृदयद्रावक घटना!

Heart Attack Death: क्रिकेट खेळता-खेळता एका २२ वर्षीय तरुणाच्या छातीत दुखू लागले. बॉलिंग करत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला.

Satish Daud

Cricket Match Heart Attack Death

जीवन जगताना कधी काय होईल, हे सांगता येणं कठीण आहे. आयुष्यात काही घटना अशा असतात, ज्या आनंदाला दु:खात बदलतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. क्रिकेट खेळता-खेळता एका २२ वर्षीय तरुणाच्या अचानक छातीत दुखू लागले.

बॉलिंग करत असताना तो जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना खरगोन जिल्ह्यात घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

क्रिकेट खेळताना तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. इंदलसिंग जाधव (वय २२) असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या बरवाह पोलिस स्टेशन हद्दीतील कटकूट गावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

इंदलसिंग हा २२ वर्षीय तरुण बरखड तांडा गाव संघाकडून खेळत होता. प्रथम फलंदाजी करताना इंदलसिंग याने ७० धावा कुटल्या. जेव्हा त्याची गोलंदाजी करण्याची वेळ आली, तेव्हा इंदलसिंगने शानदार गोलंदाजी केली, पण गोलंदाजी करताना त्याच्या छातीत दुखू लागले.

इतर मित्रांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. मात्र, ओव्हर पूर्ण करून बाहेर जातो, असं इंदलसिंगने सांगितलं. दरम्यान, गोलंदाजी करता-करता तो जमिनीवर कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. इंदलसिंग याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तरुण खेळाडूचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात सर्वांना एक मोठा धक्कादायक बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT