Madhyapradesh Crime News Saam TV News
देश विदेश

Shocking: शारीरिक संबंध ठेवताना पतीकडून व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची मागणी; पत्नीचा नकार, मानेवर पाय ठेवून जागीच संपवलं

Man Kills Wife Over Refusal to Record Intimate Video: मध्य प्रदेशात व्हिडीओ शूटसाठी नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. फक्त पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

पत्नीने शरीरसंबंध ठेवताना व्हिडिओ शूट करण्यास नकार दिल्यामुळे नराधम पतीने तिची हत्या केली आहे. ही ह्रदयद्रावक घटना मध्यप्रदेशातून उघडकीस झाली आहे. या कपलचं ५ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं.

दरम्यान, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं घडलं काय?

जबर सिंग असे आरोपीचे नाव असून, त्याचे १० फ्रेब्रुवारीला गोल्डी या तरूणीशी विवाह झाला होता. दोघेही मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील पुलेह गावात राहत होते. घटनेच्या रात्री पती दारू पिऊन घरी आला होता. रात्री उशिरा पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना त्याने व्हिडिओ बनवण्यास सुरूवात केली. त्याच्या पत्नीने व्हिडिओ शूट करण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये भांडण झालं.

शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात पतीने पत्नीवर हात उगारला. तसेच पतीने पत्नीच्या पायाने गळा दाबून खून केला. पत्नीने प्राण सोडल्यानंतर पती, दीर आणि सासऱ्याने घटनास्थळावरून पलायन केलं. सकाळी कुटुंबातील सदस्यांना तरूणीच्या हत्येची माहिती मिळाली. त्यांना गोल्डीचा मृतदेह बेडवर पडलेला अवस्थेत दिसला. यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलं, तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं.

त्यानंतर मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती, दीर आणि त्याच्या सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरूवात केली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT