Kamal Nath Vs Shivraj Singh Chouhan Saam Tv
देश विदेश

MP Election Survey: मध्य प्रदेशात मतदानापूर्वी राजकीय गणित बदललं? नवीन सर्वेक्षणात भाजप-काँग्रेस, कोण आघाडीवर

Madhya Pradesh Opinion Poll 2023 : मध्य प्रदेशात मतदानापूर्वी राजकीय गणित बदललं? नवीन सर्वेक्षणात भाजप-काँग्रेस, कोण आघाडीवर

Satish Kengar

Madhya Pradesh Opinion Poll 2023 :

मध्य प्रदेशातील सर्व 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानंतर 3 डिसेंबरला इतर सर्व राज्यांसह येथील निकालही जाहीर होतील. प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत आहे.

गेल्या काही महिन्यांत अनेक टीव्ही चॅनेल्स आणि सर्व्हे एजन्सींचे ओपिनियन पोल समोर आले आहेत, ज्यामध्ये बहुतेक काँग्रेस सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे, परंतु मतदानापूर्वी समोर आलेल्या ताज्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'इंडिया टीव्ही-सीएनएक्स; जनमत चाचण्यांमध्ये भाजप बहुमताचा आकडा पार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य प्रदेशातील एकूण 230 जागांपैकी भाजप 119 जागा जिंकू शकतो, असे सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. म्हणजे भाजप बहुमताचा आकडा ओलांडताना दिसत आहे. 2018 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 109 जागा जिंकल्या होत्या.  (Latest Marathi News)

काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर पक्षाला 107 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. सर्वेक्षणात चार जागा इतरांच्या खात्यात जात आहेत. जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर त्यातही भाजप पुढे दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, भाजपला 46.33 टक्के, तर काँग्रेसला 43.24 टक्के मते मिळू शकतात. याशिवाय 10.43 टक्के मते इतरांना जाऊ शकतात.

मागील विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे तर 2018 मध्ये भाजपला 41.02 टक्के, काँग्रेसला 40.89 टक्के आणि इतरांना 18.09 टक्के मते मिळाली होती. यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन केले आणि कमलनाथ मुख्यमंत्री झाले. याचदरम्यान मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कमलनाथ सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT