Madhya Pradesh News Saam tv
देश विदेश

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Husband And Wife Dead Body Found In Home: नवरा-बायकोचा मृतदेह घरामध्ये आढळून आल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली. नवऱ्याने बायकोची हत्या करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

Priya More

Summary:

  • इंदूरमध्ये नवरा-बायको घरामध्ये मृतावस्थेत आढळले

  • बायकोची हत्या करून नवऱ्याने आत्महत्या केल्याचा संशय

  • आर्थिक अडचणीमुळे उचललं टोकाचं पाऊल

  • परदेशीपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना

मध्य प्रदेशच्या इंदुरमधील एका घरामध्ये नवरा-बायकोचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. गळफास घेतलेल्या अवस्थेत नवरा तर बायकोचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. घरातील हे दृश्य पाहून मुलांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. नवरा- बायकोंनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरच्या परदेशीपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदा नगरमध्ये ही घटना घडली. एकनाथ वाघ आणि त्यांची पत्नी रोहिणी वाघ हे आपल्या तीन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते. या नवरा-बायकोचे मृतदेह घरामध्ये आढळून आले. एकनाथ वाघ यांचा मृतदेह एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर त्यांची बायको रोहिणी यांचा मृतदेह बेडवर आढळून आला. मृतदेहाजवळ तुटलेल्या बांगड्या होत्या. बायकोची हत्या करून एकनाथ यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच परदेशिपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नवरा-बायकोचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी एमवाय रुग्णालयात पाठवले. एकनाथ वाघ हे मेकॅनिक होते आणि त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. एकनाथ वाघ हे बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणीत होते. यामुळे चिंतेत असलेल्या एकनाथ यांनी आधी बायकोची हत्या केली त्यानंतर आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली नाही त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांसाठी अगरबत्ती घेताय? त्या आधी ही माहिती वाचाच

ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

SCROLL FOR NEXT