Hizb-ut-Tahrir News Saam TV
देश विदेश

Hizb-ut-Tahrir News : हिज्ब-उत-तहरिरचा भांडाफोड! आधी स्वतःचा धर्म सोडला, नंतर 3 हिंदू तरुणींनाही धर्मांतर करण्यास भाग पाडलं

हिज्ब-उत-तहरिरचा भांडाफोड! आधी स्वतःचा धर्म सोडला, नंतर 3 हिंदू तरुणींनाही धर्मांतर करण्यास भाग पाडलं

Satish Kengar

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये दहशतवाद (Terrorism ) विरोधी पथकाने (एटीएस) कट्टरपंथी इस्लामिक हिज्ब-उत-तहरिरच्या (Hizb ut-Tahrir) संघटनेच्या चौकशीत एक धक्कदायक खुलासा केला आहे. एटीएसने अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन असे तरुण आहेत, ज्यांनी हिंदू धर्म सोडत इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता.

यानंतर या तिघांनी हिंदू मुलींशी लग्न करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडलं. तपासात असेही समोर आले आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक भोपळमध्ये कोचिंग क्लासेस चालवत होता आणि तो शिवणीत येणाऱ्या मुलांचं ब्रेनवॉश करत होता.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या आरोपींपैकी मोहम्मद सलीम, ज्याचे खरे नाव सौरभ राजवैद्य आहे, याला हैदराबादमधून अटक करण्यात आली. याशिवाय देवीप्रसाद पांडे याने आपले नाव बदलून अब्दुर रहमान ठेवले होते. (Latest Marathi News)

हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या वेणू कुमारने आपले नाव बदलून अब्बास अली असे ठेवले आहे. या सर्वांनी हिंदू मुलींशी लग्न करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं.

याबाबत माहिती देताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भोपाळ आणि हैद्राबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये काही जिम ट्रेनर होते, काही टेलर होते, काही ऑटो चालवायचे आणि काही कोचिंग चालवायचे. समाजात राहून निष्पाप मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर करणं हा त्यांचा उद्देश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : प्रेमाच्या भरात चुका करू नका! जोडीदारामध्ये लग्नाआधी दिसणारे ‘हे’ संकेत दुर्लक्ष करणे पडेल महागात

Pune : पुण्यात आयटी इंजिनियरनं आयुष्य संपवलं, १५ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra News Live Update: बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी

वर्षातून फक्त 3 महिनेच मिळतं हे फळ; आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

Weight Loss Drink: वजन आणि पोटावरील चरबी कमी करायची आहे? मग रोज प्या 'हे' ५ हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT