Shruti Vilas Kadam
दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून करा. शरीर हायड्रेट राहण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.
ग्रीन टीमधील कॅटेचिन्स आणि कॅफिन चयापचय (Metabolism) वाढवण्यास मदत करतात. नाश्त्यानंतर किंवा सकाळच्या वेळेत ग्रीन टी घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
रात्री भिजवलेले जिरे सकाळी रिकाम्या पोटी पिल्यास पचनक्रिया सुधारण्यास आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
ताक हे प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत आहे. दुपारच्या जेवणानंतर ताक पिल्याने पचन सुधारण्यास मदत होते आणि जडपणा कमी जाणवतो.
पालक, काकडी, पुदिना आणि लिंबाचा वापर करून तयार केलेली ग्रीन स्मूदी शरीराला पोषक घटक देते आणि अतिरिक्त कॅलरी न वाढवता पोट भरल्याची भावना निर्माण करते.
रात्रीच्या जेवणानंतर कॅफिनमुक्त हर्बल टी घेतल्याने पचनास मदत होऊ शकते. यामुळे शरीर रिलॅक्स होऊन झोपेची गुणवत्ताही सुधारू शकते.
कोणतेही पेय एकट्याने पोटावरील चरबी कमी करू शकत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण जीवनशैली यांच्यासोबतच या पेयांचा लाभ होतो.