Chia Seeds Side Effects: हेल्दी समजून चिया सीड्स जास्त खाताय? मग, आरोग्याला होऊ शकतात हे ७ गंभीर आजार

Shruti Vilas Kadam

पचनाच्या तक्रारी वाढू शकतात

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने अतिसेवन केल्यास पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता किंवा जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Chia Seeds Side Effects

कोरडे चिया सीड्स खाणे टाळा

कोरडे चिया सीड्स पाणी शोषून फुगतात. त्यामुळे ते घशात अडकण्याचा किंवा गिळताना त्रास होण्याचा धोका वाढू शकतो. सेवनापूर्वी ते भिजवणे अधिक सुरक्षित मानले जाते.

Chia Seeds Side Effects

रक्तदाब खूप कमी होऊ शकतो

चिया सीड्स रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात. मात्र, रक्तदाबाच्या औषधांसोबत जास्त प्रमाणात सेवन केल्यास तो धोकादायकरीत्या कमी होऊ शकतो.

Chia Seeds Side Effects | pinterest

मधुमेहाच्या औषधांवर परिणाम होऊ शकतो

चिया सीड्स रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाची औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांचे सेवन करावे.

Chia Seeds Side Effects

अॅलर्जीचा धोका

काही व्यक्तींना चिया सीड्समुळे त्वचेवर पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी अॅलर्जिक लक्षणे दिसू शकतात.

Chia Seeds Side Effects | pinterest

रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत काळजी

रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर चिया सीड्सचे जास्त सेवन रक्तस्रावाचा धोका वाढवू शकते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

Chia Seeds Side Effects | saam tv

किती प्रमाणात खावे?

बहुतेक निरोगी प्रौढांसाठी दररोज सुमारे १ ते २ टेबलस्पून भिजवलेले चिया सीड्स पुरेसे मानले जातात. सेवन करताना भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Chia Seeds Side Effects | Freepik

Shravan Saree Tips: श्रावणात स्टायलिश दिसायचंय? हिरव्या साडीसोबत 'या' रंगांच्या साड्या ठेवा कपाटात

Shravan Saree Tips | Saam Tv
येथे क्लिक करा