Shruti Vilas Kadam
श्रावणातील पूजा, व्रत आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी पिवळ्या रंगाची साडी शुभ मानली जाते. हिरव्या बांगड्यांसोबत हा लूक खास दिसतो.
गुलाबी रंगामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. मंगळागौर किंवा हळदी-कुंकूसाठी हा रंग उत्तम पर्याय ठरतो.
जांभळ्या रंगाची सिल्क किंवा पैठणी साडी रॉयल लूक देते. गोल्ड ज्वेलरीसोबत हा रंग अधिक खुलून दिसतो.
हिरव्या बांगड्या आणि लाल साडीचे कॉम्बिनेशन नेहमीच आकर्षक वाटते. नवविवाहित महिलांसाठी हा रंग खास ठरतो.
हिरव्या बॉर्डरची ऑफ-व्हाईट साडी साधी, एलिगंट आणि पारंपरिक लूक देणारी उत्तम निवड आहे.
रॉयल ब्लू किंवा नेव्ही ब्लू रंगाची साडी श्रावणातील संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी परफेक्ट ठरते. सिल्व्हर दागिन्यांसोबत ती अधिक उठून दिसते.
केशरी रंग उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. पारंपरिक दागिने आणि गजरासोबत हा रंग सणासुदीच्या वातावरणात अधिक खुलतो.