Uttar Pradesh Girlfriend boyfriend Death Saam TV
देश विदेश

MP Crime News: 'बाबा मला वाचवा...' वडिलांना मुलीचा फोन, हॉटेलमध्ये जावून पाहताच सगळेच हादरले; दोघांचेही मृतदेह...

Indore Crime News: संबंधित तरुण- तरुणी कॉलेजला जातो म्हणून घरातून निघाले होते.

Gangappa Pujari

Madhya Pradesh Indore News: मध्य प्रदेशात एका हॉटेलमध्ये प्रियकर आणि प्रेयसीने विष घेतल्य़ाची खळबळजनक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या इंदौर शहरात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Madhya Pradesh News)

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदूरच्या (Madha Pradesh) विजय नगर भागातील ही मोठी घटना घडली आहे. संबंधित तरुण- तरुणी कॉलेजला जातो म्हणून घरातून निघाले होते. त्यानंतर त्यांनी एक रुम बूक केली. ज्यामध्ये दोघांनीही खोलीत विष प्राशन केले. घटनेनंतर दोघेही हॉटेलच्या खोलीत होते. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूआधी तरुणीने वडिलांना फोन केल्याचेही समोर आले आहे.

 वडिलांना कॉल करुन  "बाबा मला वाचवा..." असं म्हणत विनवणी केली होती. ज्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ हॉटेलच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. या तरुणीच्या कुटुंबियांना हॉटेलवर जे दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. (Latest Marathi News)

दरम्यान, प्राथमित तपासात विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा माहिती समोर आली आहे.  दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र, कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे कुटुंबियांचे मन वळवण्यासाठी आत्महत्या करण्याची योजना त्यांनी आखली. मात्र, या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. आता पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT