देश विदेश

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात अयुब खानने अमावस्येच्या रात्री महिलांच्या कबऱ्यांवर अमानुष कृत्य केले. आरोपीने कबऱ्या खोदून शरीरावर अश्लील प्रकार केला, घटना धक्कादायक ठरली आहे.

Dhanshri Shintre

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बडा कब्रस्तान परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. कब्रस्तानातील महिलांच्या कबरींची विटंबना करणारा आरोपी अयुब खान सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या कृत्यांमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अयुब खान हा भ्रामक आणि विक्षिप्त प्रवृत्तीचा माणूस असून, यापूर्वी त्याने स्वतःच्या दोन पत्नींची हत्या केली आहे. त्याच्यावर आधीच ११ गंभीर गुन्ह्यांचे खटले दाखल आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अमावस्येच्या रात्री कबरी खोदण्यासाठी जात असे. दिवसा तो महिलांच्या ताज्या कबरी शोधून काढत असे आणि नंतर रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन विनयभंगाच्या विकृत कृत्यात मग्न होत असे. तो नग्न होऊन कबरीत बसत असे. मृतदेहांचे केस ओढत खेळत असे आणि अशा विचित्र विधींमधून त्याला शक्ती मिळते असा त्याचा भ्रम होता. इतकेच नव्हे तर त्याने आधीच तीन कबरींवर जादूटोण्याचे प्रयोग केले असल्याचीही माहिती मिळाली आहे.

१९ मे रोजी तसेच २१ सप्टेंबर रोजी बडा कब्रस्तानमध्ये मृतदेहांशी छेडछाड झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांनंतर मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून मुंडवाडा येथील ५० वर्षीय अयुब खान याची ओळख केली आणि त्याला अटक केली. आरोपीला घटनास्थळ दाखवून तपास प्रक्रिया सुरू असताना मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाचे लोक तेथे जमा झाले होते. त्यांनी आरोपीला त्यांच्या स्वाधीन करून शिक्षा करण्याची मागणी केली.

आरोपीने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कबरींशी अन्याय केला असल्याने उपस्थित लोकांचे संतापाने चित्त ढवळून निघाले होते. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने जमावाला पांगवले तरी उपस्थित लोकांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

पोलिस अधीक्षक मनोज कुमार रॉय यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गतही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ वर्षे तुरुंगवास भोगूनही आरोपीची प्रवृत्ती बदलली नाही. त्याने आपल्या दोन पत्नींची हत्या केल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला ‘शैतान’ अशी हाक मारण्यास सुरुवात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस! लाडक्या बहिणींनो मुदतीपूर्वी KYC करा, कोणती कागदपत्रे आवश्यक, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात लोणिकंद-थेऊर फाटा येथे भीषण अपघात

Winter Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी! तापमान ११ अंशांच्या खाली, 'या' जिल्ह्यांना हुडहुडी

Sangli crime : सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल खून, वाढदिवशीच नेत्याची हत्या, त्यानंतर...

PM Kisan Yojana: ९.७ कोटी शेतकर्‍यांना आज खुशखबर मिळणार! ₹२००० च्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT