Woman Harassed for Dowry Intimate Video Goes Viral Saam
देश विदेश

लग्नात हुंडा मिळाला नाही; नवऱ्याचं डोकं फिरलं, बायकोसोबतच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ केले व्हायरल

Woman Harassed for Dowry Intimate Video Goes Viral: हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ शूट केला. तसेच समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केला.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील रीवा येथून पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नवऱ्यानं बायकोसोबतचे बेडरूममधील खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहे. तसेच व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केले आहे. याची माहिती मिळताच पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना रीवा जिल्ह्यातील समान पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. पतीकडून पत्नीवर वारंवार हुंड्यासाठी दबाव टाकला जात होता. तिच्यावर शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता. त्यानं तिला मनाविरूद्ध लैगिंक संबंध ठेवण्यासही भाग पाडले. तसेच व्हिडिओही शूट करून शेअर केला.

या प्रकरणाबाबत माहिती देताना पीडितेनं सांगितलं की, लग्न होण्याआधीपासूनच सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी छळ सुरू होता. तरूणीच्या कुटुंबियांना हुंडा देणं शक्य नव्हतं. त्यांनी असमर्थता देखील व्यक्त केली. दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता.

दरम्यान, पीडित विवाहितेचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिनं पोलिसांसमोर सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आणला. तसेच तक्रार दाखल करून पोलिसांसमोर न्यायाची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेतली असून, तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turichya Danyacha Zunka Recipe : जेवणाचा गावरान बेत; गरमागरम भाकरी अन् तुरीच्या दाण्याचा झुणका, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update : पुणे महानगरपालिकेत आंदेकर- कोमकर संघर्ष होणार

Gharoghari Matichya Chuli : जानकी अन् हृषीकेशच्या वर्तमानावर भूतकाळाचं सावट; नवा प्रोमो पाहून बसेल धक्का-VIDEO

भाजपच्या यादीतही घराणेशाहीचा डंका! वाचा कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांनी घराणेशाहीला प्राधान्य दिलं?

8th Pay Commission: आनंदाची बातमी! आजपासून आठवा वेतन आयोग लागू; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT