Madhya Pradesh Crime News Saam tv
देश विदेश

Madhya Pradesh Crime News: 'दृश्यम' स्टाइलने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, ६ महिने पोलिसांना भरकटवलं, पण...

Madhya Pradesh Latest News: पण अखेर पोलिसांनी त्यांनाच आपल्या जाळ्यात अडकवून अटक केली आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Priya More

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'दृश्यम' चित्रपट (Drishyam Movie) पाहून या महिलेने हे कृत्य केले आहे. ऐवढंच नाही दृश्यममध्ये ज्यापद्धतीने पोलिसांना चकवा दिला जात होता तशाच पद्धतीने आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत होते.

पण अखेर पोलिसांनी त्यांनाच आपल्या जाळ्यात अडकवून अटक केली आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मध्य प्रदेशातील अशोक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी राहणारा सौरभ जैन नावाची व्यक्ती गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होती. याप्रकरणी सौरभच्या कुटुंबीयांना पोलिसात तक्रार देखील केली होती. पोलीस सौरभचा शोध देखील घेत होते. याच दरम्यान पोलिसांनी सौरभची पत्नी आणि तिच्यासोबत राहणाऱ्या दीपेश भार्गवला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

सौरभच्या पत्नीनेच त्यांच्यासोबत काही तरी केले असावे असा संशय सौरभच्या भावाल होता. त्यामुळेच पोलिसांनी सौरभची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभचे लग्न आठ वर्षांपूर्वी ऋचा जैनसोबत झाले होते. लग्नानंतर ऋचा आणि दिपेश भार्गव यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर सौरभ त्यांच्या प्रेमात अडथळा ठरु लागला. त्यामुळे ऋचा आणि दिपेशने सौरभचा काटा काढण्याचा कट रचला.

23 फेब्रुवारी 2023 रोजी ऋचा उपचारांचा बहाणा करुन पती सौरभला बाहेरगावी घेऊन गेली. विदिशा जिल्ह्यातील शमशाबादजवळ ऋचा आणि दीपेशने सौरभची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. शमशाबाद पोलिसांनी या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. पण सहा महिन्यांनंतर सौरभच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा हे हत्येचं प्रकरण समोर आलं.

त्यानंतर पोलिसांनी ऋचा आणि दिपेशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सौरभच्या हत्येची कबुली दिली. आरोपींनी दृश्यम चित्रपट पाहिला होता. त्याचप्रमाणे ते पोलिसांची दिशाभूल करत होते. पण पोलिसांनी त्यांना जाळ्यात अडकवले. शेवटी आरोपींनी सौरभची हत्या केल्याचे मान्य केले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास ते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT