condoms distributed In mass marriage Saamtv
देश विदेश

MP News: धक्कादायक! सामूहिक विवाह सोहळ्यात नववधूंना चक्क ‘कंडोम’चा आहेर; मध्यप्रदेश सरकारचा प्रताप

condoms distributed In mass marriage Conference: सोहळ्यात नववधूंना मेकअप बॉक्समधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचे समोर आला आहे.

Gangappa Pujari

Jhabua News: मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये सामुहिक विवाह सोहळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेअंतर्गत झालेल्या या सोहळ्यात नववधूंना मेकअप बॉक्समधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेवू...

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशमधील थंडला येथे सोमवारी एका सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात तब्बल २९६ जोडपी विवाहबंधनात अडकली. मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेअंतर्गत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नववधूंना मेकअप बॉक्समधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचे समोर आले आहे..

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेंतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता... यावेळी नवविवाहित जोडप्यांना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ही पाकिटे मेक-अप बॉक्समध्ये सापडली आहेत, जी योजनेचा भाग म्हणून जोडप्यांना देण्यात आली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

हे प्रकरण समोर आल्यानंतर वरिष्ठ जिल्हा अधिकारी भुरसिंग रावत यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला पुढे केले आहे. “कुटुंब नियोजनाशी संबंधित जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांनी कंडोम आणि गर्भनिरोधकांचे वाटप केले असावे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पण या प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schezwan Chakli Recipe : चकलीला द्या चायनिज तडका, १० मिनिटांत बनवा कुरकुरीत शेजवान चकली

Maharashtra Live News Update: तमाशाच्या कार्यक्रमात तरुणाला लाकडी काठ्याने बेदम मारहाण

Purandar Airport: विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटला; शेतकऱ्यांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईत मोठा राडा; CSMT स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रस्ता अडवला

Mumbai Crime: गार्डनमध्ये एकटीला बघून नियत फिरली, दिव्यांग महिलेसोबत पोलिसाचं भयंकर कृत्य, नागरिकांनी बघितलं अन्...

SCROLL FOR NEXT