Madhya Pradesh Saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh: बिअर पिणं बेतलं जीवावर! दोन SAF जवानांचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरु

Madhya Pradesh News: मध्यप्रदेशच्या छिंदवादा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशमध्ये बिअर पिऊन विषबाधा झाल्याने विशेष सशस्त्र दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यप्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्यप्रदेशच्या छिंदवादा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशमध्ये बिअर पिऊन विषबाधा झाल्याने विशेष सशस्त्र दलाच्या (SAF) दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यप्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.

कॉन्स्टेबल हेड धनीरक उईके (वय ५५) आणि कॉन्स्टेबल प्रेमलाल काकोडिया (५४) असे मृत जवानांचे नाव आहे. कॉन्स्टेबल प्रेमलाल हे रात्री एसएएफ युनिट कमांडर यांच्या बंगल्यावर पहारा देत होते. तेव्हा त्यांनी बिअर प्यायली आणि त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धनीराम यांच्या स्कूटरमध्ये दोन बिअरचे कॅन, दोन ग्लास आणि एक पावडर असलेले पाकिट सापडले. धनीराम आणि प्रेमलाल यांनी बिअर प्यायली. त्यानंतर धनीराम घरी जाण्यासाठी निघाले आणि प्रेमलाल यांनी पुन्हा आपली ड्युटी सुरु केली. धनीराम घरी जात असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. रुग्णालयात नेण्याआधीच धनीरामचा मृत्यू झाला. तर प्रेमलाल हे आजारी पडले.त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना रविवारी पहाटे ५ वाजता शुद्ध आली. त्यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.

प्रेमलाल यानी सांगितले की, 'धनीराम यांनी रात्री ९ वाजता बिअर आणली होती. आम्ही दोघांनी बंगल्याच्या बाहेर बिअर प्यायली. तिथे तिसरी कोणतीच व्यक्ती उपस्थित नव्हती'.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांची प्यायलेल्या बिअरमध्ये त्यांच्यापैकी कोणीतरी विषारी पदार्थ मिसळला असेल, या विषारी पदार्थांमुळेच त्यांचा मृत्यू झाला असेल. आम्ही त्या बिअरमधील सॅम्प्ल्स फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवले आहे, असे एसपी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Red Velvet Cake Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, स्पाँजी आणि क्रीमी रेड वेलवेट केक, वाचा रेसिपी

Congress : काँग्रेसचा धक्कादायक निर्णय! भाजपमध्ये गेलेल्या ७९ नेत्यांवर निलंबनाची कारवाई; राजकारणात खळबळ

शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत पगारात मोठी वाढ होणार, 8व्या वेतन आयोगातील 2.57 फिटमेंट फॅक्टरचे संभाव्य गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT