Madhya Pradesh toxic liquor death latest news 
देश विदेश

Liquor Tragedy : धक्कादायक बातमी! विषारी दारूमुळे मोठा अनर्थ; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात खळबळ

Madhya Pradesh liquor death : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारू प्राशन केल्याने ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असून पोलिसांकडून तपास आणि कारवाई सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Madhya Pradesh toxic liquor death latest news : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. बनावट आणि विषारी दारू प्राशन केल्यामुळे अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सागर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील काही ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर विक्री केली जाणारी दारू प्राशन केली होती. दारू पिल्यानंतर अवघ्या काही वेळातच अनेकांची तब्येत अचानक बिघडण्यास सुरुवात झाली. त्यांना उलट्या, चक्कर येणे आणि अंधारी येणे असा त्रास होऊ लागला.

परिस्थिती बिघडल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अनेक जणांची प्राणज्योत मालवली. तर काही जणांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रशासनाची धावपळ अन् कारवाई

या दुर्घटनेची माहिती मिळताच सागर जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विषारी दारूची विक्री करणाऱ्या अवैध अड्ड्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ही बनावट दारू नक्की कुठून आली आणि ती कोणी तयार केली होती, याचा शोध पोलिस घेत आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

SCROLL FOR NEXT