भारतातील अनेक मोठी शहरं वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडली जात आहे. भारतीय रेल्वेने भारतातील अनेक मार्गांवर अनेक वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत. वंदे भारत ट्रेनमुळे होणारा आरामदायी आणि वेगवान प्रवास तसंच सोयी सुविधांमुळे या ट्रेनची मागणी वाढत चालली आहे. पूर्णपणे वातानुकूलित असाणाऱ्या या ट्रेनमुळे फक्त वेगवान प्रवास होत नाही तर विमानसेवांशी जुळणाऱ्या लक्झरी देखील मिळतात.
सध्या देशामध्ये १३८ हून अधिक वंदे भारत ट्रेन धावतात. या वंदे भारत ट्रेनला प्रवेशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वेने आणखी वंदे भारत ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. आता आणखी १०० वंदे भारत ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. देशातील ज्या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावतात त्यामधील सर्वात लांबीचा मार्ग कोणता आणि या प्रवासाला किती पैसे मोजावे लागतात हे आपण पाहणार आहोत....
- नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत ट्रेन ८ तासांत ७७१ किमी अंतर कापते. या ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासचे भाडे ३३७० रुपये आहे. तर एसी चेअर कारचे भाडे १८२० रुपये इतके आहे. हा प्रवास खूपच आरामदायी आहे.
- चेन्नई एग्मोर-नागरकोइल वंदे भारत ट्रेन ८ तास ५० मिनिटांत ७२७ किमी प्रवास करते. या ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासच्या तिकिटासाठी ३२६० रुपये मोजावे लागतात. तर एसी चेअर कारच्या तिकिटासाठी १७७५ रुपये तिकीट आहे.
- विशाखापट्टणम-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन ६९९ किमीचा प्रवासा फक्त ८ तास ५५ मिनिटात पार करते. या ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासचे भाडे ३१३५ रुपये इतके आहे. तर एसी चेअर कारचे भाडे १६८० रुपये आहे.
- अजमेर-चंडीगड वंदे भारत ट्रेन ८ तास ३५ मिनिटांत ६७८ किमी अंतर कापते. प्रवाशांना या ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासमधून प्रवास करण्यासाठी ३१८५ रुपये मोजावे लागतात. तर एसी चेअर कारमधून प्रवास करण्यासाठी १७३५ रुपये द्यावे लागतात.
- सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत ट्रेन ८ तास २५ मिनिटांत ६६१ किमी अंतर कापते. या ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासचे भाडे ३०९५ रुपये आहे. तर एसी चेअर कारमधून प्रवास करण्यासाठी १६९५ रुपये मोजावे लागतात.
- नवी दिल्ली-एसएमव्हीडी कटरा वंदे भारत ट्रेन ८ तास १५ मिनिटांत ६५५ किमी प्रवास करते. या ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासमधून प्रवास करण्यासाठी ३०६५ रुपये मोजावे लागतात. तर एसी चेअर कारमधून प्रवास करताना तिकीटासाठी १६८० रुपये खर्च करावा लागतो.
- आनंद विहार टर्मिनल-अयोध्या कॅन्ट वंदे भारत ट्रेन ८ तास १५ मिनिटांत ६२९ किमी अंतर कापते. या ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासमधून प्रवास करताना तिकीटासाठी २९८० रुपये खर्च करावे लागतात. तर एसी चेअर कारमधून प्रवास करण्यासाठी १६४० रुपये तिकीटासाठी द्यावे लागतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.