Lucknow Shocker Saam Tv News
देश विदेश

शेजाऱ्याची वाईट नजर! आई अन् मुलीचा बाथरूममधील प्रायव्हेट VIDEO शूट, व्हायरल करत मारहाण

Man Harasses Woman Records Private Video: तरूणानं शेजारच्या महिलेचं आणि मुलीचे बाथरूममध्ये अंडरगारमेंट वाळत घालतानाचा व्हिडिओ शूट केला. तसेच व्हायरल केला.

Bhagyashree Kamble

  • शेजारी राहणाऱ्या तरूणाचं भयानक कृत्य.

  • महिला अन् मुलीचा बाथरूममधला व्हिडिओ काढला.

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. एका तरूणानं शेजारच्या महिलेचं आणि तिच्या मुलीचे बाथरूममध्ये अंडरगारमेंट वाळत घालतानाचा व्हिडिओ शूट केला होता. तसेच शेअर करून महिलेची आणि तिच्या लेकीची बदनामी केली होती. पीडित महिलेनं याचा विरोध केला. तेव्हा आरोपी महिलेच्या घरात घुसला. तसेच कुटुंबाला मारहाण केली. पीडितेनं पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिनहट परिसरातील एका महिलेनं आरोप केला की, शरीफ हा तरूण शेजारी राहतो. अनेकदा अश्लील कमेंट करतो. तसेच टेरेसवर पीडितेसमोर नग्न होऊन फिरतो. त्यानं महिला आणि तिच्या मुलींचे बाथरूममध्ये जात असतानाचा व्हिडिओ शूट केला होता. नंतर हा व्हिडिओ त्यानं मित्रांमध्ये शेअर केला.

पीडितेनं याचा विरोध केला. तेव्हा त्यानं घरात घुसून कुटुंबाला मारहाण केली. त्यानं काही ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. तो महिला अंडरगारमेंट वाळत घालत असताना शूट करतो. तसेच व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करतो. पीडित महिला आणि काही तरूणींनी याचा विरोध केला. तेव्हा तो तरूणींवर हल्ला करायचा.

पीडित महिला आणि तिच्या मुलींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT