UP Crime News: लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराचे अश्लील फोटो बनवून 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने या तरुणीने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे या तरुणाची नोकरी देखील गेली. एवढेच नाही तर तरुणाचे जमलेले लग्नाही मोडले. यानंतर या तरुणाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)
प्रयागराज येथील रहिवासी असलेला तरुण सरोजिनी नगर औद्योगिक परिसरात असलेल्या ऑटोफॉर्ममध्ये काम करायचा. यादरम्यान त्याने लखनऊच्या आझाद नगरमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. जिथे उन्नावमधील बिघापूर येथे राहणारी एक तरुणी आधीच राहत होती. एकाच घरात राहत असताना तरुण आणि तरुणीची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर गप्पा सुरू झाल्या. (Lucknow News)
यावेळी तरुणीने तरुणाचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केले. त्यानंतर ही तरुणी ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. मात्र, यादरम्यान तरुणाने तरुणीला समजवण्याचे खूप प्रयत्न केले.
मात्र ती मान्य झाली नाही आणि 10 लाख रुपयांची मागणी करू लागली. न दिल्याने आरोपी तरुणीने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार करून तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना रिक्वेस्ट पाठवून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. (Crime News)
या घटनेमुळे तरुणाला आपली नोकरी गमवावी लागली आहे. तसेच ज्या मुलीशी लग्न पक्के झाले होते ते देखील लग्न मोडले. अशा स्थितीत तरुणाने सायबर सेलमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवली. पोलीस गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.