Gas Cylinde saam tv
देश विदेश

Gas Cylinder: गुड न्यूज! ३०० रुपयांनी स्वस्त मिळतोय गॅस सिलिंडर, कुठे अन् कसा मिळवायचा?

Pradhanmantri Ujjwala Yojana: देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. तरी देखील काही नागिकांना ३०० रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळत आहे. कुठे अन कसा हा सिलिंडर मिळवायचा वाचा...

Priya More

Summary -

  • उज्ज्वला योजनेत गॅस सिलिंडर ३०० रुपयांनी स्वस्त

  • लाभार्थ्यांना मोफत कनेक्शन आणि इतर सुविधा

  • ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध

  • गरीब कुटुंबातील महिलांसाठी विशेष योजना

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका जगाला बसत आहे. या युद्धामुळे भारतामध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारकडून वारंवार दावा केला जात आहे की परिस्थिती सामान्य आहे. तुटवड्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. असे असताना देखील एका वर्गाला ३०० रुपयांनी स्वस्त गॅस सिलिंडर मिळत आहे. सरकारकडूनच त्यांना स्वस्तात सिलिंडर दिला जात आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० चे अनुदान मिळते. म्हणजेच या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर सर्वसामान्य ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दरापेक्षा ३०० रुपयांनी स्वस्त दिला जात आहे. या लाभार्थ्यांना कोणत्याही सुरक्षा ठेवीशिवाय किंवा इन्स्टॉलेशन शुल्काशिवाय गॅस सिलिंडर कनेक्शन दिले जाते. या सर्व लाभार्थ्यांना १४.२ किलो एलपीजी सिलिंडर/ ५ किलो एलपीजी सिलिंडर, प्रेशर रेगुलेटर, १.२ मीटर सुरक्षा पाईप, डीजीसीसी पुस्तिका, पहिली रिफिल मोफत आणि दोन बर्नर स्टोव्ह मोफत दिला जात आहे.

तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ मिळवू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्टेशन करावे लागेल. ग्राहक https://pmuy.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अर्जाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा अर्ज सादर करण्यासाठी मदतीकरिता त्यांच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊ शकतात. प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. CSC केंद्राद्वारे अर्ज सादर केल्यास २० रुपये शुल्क आकारले जाईल. ऑफलाइन पद्धतीने ग्राहक थेट त्यांच्या जवळच्या OMC च्या LPG वितरकाकडे अर्ज सादर करू शकतात.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये १८ वर्षांवरील महिला, कुटुंबातील असा सदस्य ज्याचे कोणत्याही तेल विपणन कंपनीकडून (OMC) दुसरे कोणतेही LPG कनेक्शन नाही आणि गरीब कुटुंबातील सदस्य असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला केवायसी केलेला अर्ज, त्याच्यावर पासपोर्ट साईजचा फोटो आणि सही केलेली असावे. त्याचसोबत, ओळखपत्र म्हणून आधारकार्डची झेरॉक्स, रेशन कार्डवर असलेल्या घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्डची झेरॉक्स, घराच्या पत्त्याचा पुरावा, अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील, पासबुक, कॅन्सल चेक याची आवश्यकता असेल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना दरडोई वापर वाढला आहे. विविध योजनांमुळे पीएमयूवाय लाभार्थ्यांमध्ये वार्षिक दरडोई एलपीजी वापरात सातत्याने वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सरासरी वापर ३.०१ सिलिंडर, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३.९५ सिलिंडर आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४.४३ सिलिंडर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT