LPG Gas Connection
LPG Gas Connection Saam Tv
देश विदेश

LPG Cylinder Price : महागाईतून मोठा दिलासा, गॅस सिलेंडर झाला तब्बल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

साम टिव्ही ब्युरो

LPG Cylinder Price : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर कमी झालेत. वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात ही कपात झाली आहे. (LPG Cylinder Price Latest Price)

आज (मंगळवार) 1 नोव्हेंबर 2022 पासून 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले असले, तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरची किंमत स्थिर आहे.

गॅस सिलेंडरचे नवीन दर काय?

- मुंबईत व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी यापूर्वी 1844 रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता सिलेंडरसाठी 1696 रुपये मोजावे लागणार आहे.

- दिल्लीत 19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची (LPG Gas) नवीन किंमत आता 1744 रुपये इतकी झाली आहे, जी पूर्वी 1859.5 रुपये होती.

- कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1846 रुपये असेल. पूर्वी लोकांना 1995.50 रुपये मोजावे लागत होते.

- चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1893 रुपये आहे. यापूर्वी यासाठी 2009.50 रुपये मोजावे लागत होते. (LPG Gas Latest Rates)

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर किती?

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाली असली, तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर कोलकात्यात 14.2 किलोचा सिलेंडर 1079 रुपये, चेन्नईमध्ये 1068.5 आणि मुंबईत 1052 रुपयांना मिळत आहे.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलतात दर

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला 14 किलो घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

SCROLL FOR NEXT