LPG Crisis Saam Tv
देश विदेश

LPG Crisis: जगातील सर्वात मोठ्या LNG सेंटरवर हल्ला; गॅस पुरवठ्यावर मोठं संकट, भारतात LPG सिलेंडर महागणार?

LPG Crisis Due to War: सध्या जागतिक पातळीवर युद्ध सुरु आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. आता कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला करण्यात आला आहे. याचा भारतावरदेखील परिणाम होणार आहे.

Siddhi Hande

जागतिक पातळीवर सध्या युद्ध सुरु आहे. इराण-इस्त्रायल युद्धामुळे खूप जास्त तणाव निर्माण झाला आहे.यामुळे जागतिक पातळीवर व्यापारावर दुष्परिणाम झाला आहे. दरम्यान, आता देशातील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला केला आहे. यामुळे खूप जास्त नुकसान झाले आहे. याबाबत इराणने माहिती दिली आहे.

कतार एनर्जीचे सीईओ साद अल काबी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, इराणच्या हल्ल्यामुळे कतारमध्ये एलएनजी सेंटरवर परिणाम झाला आहे. येथील १७ टक्के लिक्विफाइड नॅचरल गॅस एक्सपोर्टची क्षमता संपुष्टात आली आहे. रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक उत्पन्न २० बिलियन डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे युरोप आणि आशिया येथील पुरवठ्यावर वाईट परिणाम होणार आहे,

कतार एनर्जीचे सीईओ साद अल काबी यांनी सांगितले की, या हल्ल्यात कतारमधील १४ एलएनजी ट्रेनमधील दोन आणि गॅस टू लिक्विड्स (GTL)मधील एकाला नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईला कमीत कमी तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.यामध्ये १.२८ मिलियन टन प्रति वर्ष नुकसान झाले आहे.

साद अल काबी यांनी सांगितले, मी कधीच स्वप्नातदेखील याचा विचार केला नव्हता. मध्य पूर्व आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या युद्धामुळे खूप चिंता निर्माण झाली आहे. एलएनजीच्या नुकसानामुळे संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे. युरोपातील गॅसच्या किंमतीी ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

भारतावर काय परिणाम होणार?

भारतात एलएनजीच्या ४० टक्के भाग हा कतारमधून मिळते. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारताने यापूर्वीही या प्रदेशात पायाभूत सुविधांसह नागरी सेवांवर लक्ष्य करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे सध्या त्या भागांमध्ये झालेला हल्ला हा चिंताजनक आहे. यामुळे सध्याच्या ऊर्जा परिस्थितीला अस्थिर करण्याचे काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाके यांना पुणे ग्रामीण पोलिसांची नोटीस

Skin Care: ग्लोईंग त्वचा हवी असेल तर सकाळी करा हे 3 स्किनकेअर उपाय; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल शाईन

काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्यासह अनेकांनी पक्षाला ठोकला रामराम; सरकारवर गंभीर आरोप करत BRSमध्ये केला प्रवेश

Sugar Free Lemon Juice: वजन कमी करण्यासाठी प्या शुगर फ्रि लेमन ज्यूस

Bank Strike Update : उद्यापासून ३ दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप, ATM - UPI ही बंद राहणार? महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT