Pune Crime News Saam tv
देश विदेश

Bihar Crime News : संतापजनक! प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचं भयंकर कृत्य; दोघांचे नको त्या अवस्थेतील फोटो पाठवले पतीला

Couple Fight : तो तिच्याशी क्रूरतेने वागत आहे. त्यामुळे तरुणीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

साम टिव्ही ब्युरो

Bihar News : बिहारच्या गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा गैरफायदा घेतला आहे. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून या तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने तिचा एक अश्लील व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. आता तो तिच्याशी क्रूरतेने वागत आहे. त्यामुळे तरुणीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Girlfriend Viral Video)

नवरदेवाला पाठवला प्रेयसीचा व्हिडिओ

प्रियकराच्या जाचाला कंटाळून या तरुणीने दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र आतापर्यंत प्रियकराने तिची तीन लग्न मोडली आहेत. ज्या मुलाशी तिचे लग्न ठरते त्या मुलाला प्रियकर तरुणीचा अश्लील व्हिडिओ पाठवत आहे. या सर्व जाचाला कंटाळून रविवारी तरुणीने महिला पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली आहे.

प्रियकराचा लग्नासाठी नकार

तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान तरुणीशी लग्न करण्यासाठी तो असं करत असावा असे पोलिसांना वाटले. मात्र या नराधमाने तरुणीला लग्नासाठी या आधीच नकार दिला आहे.

राजू असं या तरुणाचं नाव असून तो मीरगंज शहरात दागिन्यांचे दुकान चालवायचा. काही वर्षांपूर्वी पैसे कमवून तो गावी परतला. घरी आल्यावर तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तो आपल्याशी लग्न करेल असे तरुणीला वाटू लागले. त्यामुळे तरुणी त्याच्या जाळ्यात फसत गेली. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT