Pigeon Theft Saam Tv
देश विदेश

Pigeon Theft: प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा निघाला चोर, कबूतराने कशी केली सोनसाखळीची चोरी?

pigeon steals gold chain from jewellery shop in Rajasthan: राजस्थानमध्ये एका कबुतराने चक्क सोनसाखळी चोरी केली. या कबूतराचा पाठलाग करून नागरिकांनी ही सोनसाखळी मिळवली. सोनंसाखळी सुरक्षित सापडल्यानंतर व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Priya More

Summary -

  • राजस्थानच्या नागौरमध्ये कबुतराने सोनसाखळी चोरी केली

  • सोनसाखळीची किंमत अंदाजे १ लाख रुपये होती

  • चोरीचा संपूर्ण प्रकार व्हिडिओत कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल

  • बऱ्याच प्रयत्नांनंतर सोनसाखळी मिळाली तेव्हा व्यापाऱ्यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा कबुतर चोर निघालाय. त्यामुळे कबुतरावर कोणी आणि कुठे चोरीचा आरोप ठेवण्यात आला? पाहूया या रिपोर्टमधून...

जुन्या काळात निरोप पोहचवण्यासाठी कबुतरांचा वापर व्हायचा, हे आपल्याला ठाऊक आहे. चित्रपटातही प्रियकर-प्रेयसी एकमेकांना कबुतराच्या माध्यमातून पत्र पाठवायचे असं आपण पाहिलं असेल. मात्र राजस्थानमधील एका कबुतरावर चोरीचा आरोप करण्यात आलाय... ते ही १ लाख रुपयांच्या सोनसाखळीचा...

राजस्थानच्या नागौरमध्ये एक कबुतरं चक्क सोनाऱ्याच्या दुकानात घुसून १ लाख रुपयांची सोनसाखळी घेऊन उडून गेलाय. सुरुवातीला कबुतराची हे कृत्य पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात येताच कबुतराला पकडण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी जमली.

कबूतर सोन्याची साखळी घेऊन एका उंच इमारतीच्या छतावर जाऊन बसला. खाली लोकांची गर्दी झाली, प्रत्येकाच्या नजरा त्या कबुतरावर आणि त्याच्या चोचीतल्या सोनसाखळीवर होती. अखेर, बराच संघर्ष केल्यानंतर कबुतरानं आकाशात झेप घेतली आणि सोनसाखळी जमिनीवर पडली. सोनंसाखळी सुरक्षित सापडल्यानंतर व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सध्या या 'उडत्या चोरा'चा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. त्यामुळे भविष्यात फक्त चोरांपासूनच नव्हे तर कबुतरांपासूनही सोनारांना सावधान व्हावं लागणार की काय? अशीच परिस्थिती निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11 हजार कॅरेटचा दुर्मिळ माणिक सापडला, म्यानमारच्या खाणीत गवसला मौल्यवान खडा

PM Modi: भारतावर मोठं संकट? वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटिंग सुरू करा; PM मोदींच्या आवाहनामागे काय अर्थ दडलाय?

Maharashtra News Live Update: विहीर कोसळून बाप- दोन मुलांचा मृत्यू

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी थलपती विजय, विजयच्या शपथविधीला त्रिशाची जादू

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT