Rahul Gandhi On Wayand And Rae Bareli 
देश विदेश

Rahul Gandhi : वायनाड की रायबरेली, कोणता मतदारसंघ निवडणार? राहुल गांधी द्विधा मनस्थितीत

Rahul Gandhi On Wayand And Rae Bareli : वायनाड का रायबरेली कोणता मतदारसंघ निवडावा याप्रकरणी राहुल गांधी दुविधा मनस्थितीत आहेत. राहुल गांधी दोन्ही जागेवर खासदार म्हणून निवडून आलेत. यामुळे कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्तव करावे या निर्णय राहुल गांधींना घेत येत नाहीये.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: केरळच्या वायनागड आणि उत्तर प्रदेशच्या रायबरेलीच्या मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधींनी विजय मिळवलाय. दोन्ही ठिकाणच्या जनतेने राहुल यांना भक्कम पाठिंबा देत त्यांना भरघोस मतांनी विजयी केले. या दोन्ही जागांवर विजय मिळवणाऱ्या राहुल गांधींसमोर एक मतदारसंघ निवडण्याचे मोठे आव्हान आहे. या प्रश्नावर खुद्द राहुल संभ्रमात आहेत. राहुल गांधी या दोन्हीपैकी एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतील. त्यामुळे त्यांना या दोन्ही मतदारसंघापैकी एक मतदारसंघ त्यांना सोडावा लागेल.

वायनाड किंवा रायबरेली लोकसभा मतदारसंघात खासदार राहायचे की नाही या संभ्रमात ते असल्याचे राहुल गांधी म्हणालेत. बुधवारी केरळमध्ये आलेले राहुल गांधी यांनी मलप्पुरममध्ये कोणता मतदारसंघ सोडायचा या द्विधा मन:स्थितीत असल्याचं ते म्हणाले. दरम्यान ते जो काही निर्णय घेतील, त्याचा दोन्ही मतदारसंघातील लोकांना आनंद होईल. लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल वायनाडच्या जनतेचे आभार मानतो,असं राहुल गांधी म्हणालेत.

रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला

रायबरेलीची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघाशी गांधी घराण्याचे जुने नाते आहे. जवाहरलाल नेहरूंपासून सुरू झालेले हे नाते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी पुढे नेले. यानंतर सोनिया गांधी यांनी हे नाते जपलं. सोनिया रायबरेलीतून निवडणूक लढवत होत्या पण यावेळी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच राहुल गांधींना तेथून उमेदवारी दिली. जिथे जनतेने राहुल गांधींना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले. गांधी घराण्याशी असलेले त्यांचे नाते अतिशय घट्ट आणि भावनिक असल्याचे येथील जनतेने दाखवून दिले.

वायनाडमध्ये दुसऱ्यांदा विजय

वायनाडमध्ये राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत. राहुल गांधींनी २०१९ मध्ये अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये त्यांचा रायबरेलीमधून पराभव झाला. भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला होता. तर वायनाडमधून राहुल गांधींनी दणदणीत विजय मिळवला होता. राहुल यांचा अमेठीतून पराभव झाला तेव्हा वायनाडच्या जनतेने त्यांना पाठिंबा दिला होता. वायनाडमुळेच ते संसदेत पोहोचले होते, त्यामुळे या दोन ठिकाणांपैकी एक मतदारसंघ निवडणं हे निश्चितच मोठं आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT