देश विदेश

Politics News: लोकसभेपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; सहावेळा आमदारकीय केलेल्या नेत्याने सोडला पक्ष

TCM News: सहावेळा आमदारकी निभावलेले तृणमूल काँग्रेसचे तापस रॉय यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. तृणमूल काँग्रेसचे आमदार तापस रॉय यांनी सोमवारी बंगाल विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष विमान बंदोपाध्याय यांच्याकडे सुपूर्द केलाय.

Bharat Jadhav

Trinamool Congress Leader :

तापस रॉय यांनी पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत हे पाऊल उचलले. मी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. आपण आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असल्याचं तपास रॉय म्हणालेत. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिल्यानंतर मी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले. मी आता मुक्त पक्षी आहे.(Latest News)

राय यांनी पक्ष सोडण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू आणि तृणमूल काँग्रेसचे आणखी एक बंडखोर नेते कुणाल घोष सोमवारी सकाळी उत्तर कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तपास रॉय यांनी राजीनामाच्या निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले, मात्र तो काही उपयोग झाला नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीएमसी आमदार तापस रॉय यांनी पहिल्यांदा १९९६ मध्ये विद्यासागर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तापस हे पहिल्यांदा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले आहे. २००१ मध्ये काँग्रेसशी सोडचिठ्ठी करत ते टीएमसीवरमध्ये सहभागी झाले. टीएमसीने २००१ मध्ये त्यांना बडा बाजार या मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले.

२०११ मध्ये ते उत्तर २४ परगना जिल्ह्यात बारानगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेथेही त्यांनी विजय मिळवला. तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर सातत्याने होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते कंटाळले असल्याचं तापस रॉय यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT