DMK-Congress Alliance: Saam Tv
देश विदेश

DMK-Congress Alliance:तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी कायम; जुनाच फॉर्म्युला ठरला कामाचा

lok sabha election : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा पक्ष द्रविड मुनेत्र कळघम आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटप निश्चित झालं आहे. द्रमुकने तामिळनाडूमध्ये पुद्दुचेरीतील एकमेव जागा सोडून काँग्रेसला ९ जागा दिल्यात. मुख्यमंत्री स्टॅलिन आणि TNCC प्रमुख के सेल्वापेरुंथगाई यांनी AICC नेते केसी वेणुगोपाल आणि अजॉय कुमार यांच्या उपस्थितीत जागावाटप निश्चित केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

DMK-Congress Alliance:

तामिळनाडूत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. काँग्रेसला डीएमकेची साथ मिळाल्याने त्यांची ताकद वाढलीय.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा पक्ष द्रविड मुनेत्र कळघम (DMK)आणि काँग्रेसमधील जागावाटप निश्चित झालं. दोन्ही पक्षांनी २०१९ मधील जागावाटपाचा फॉर्म्युला कायम ठेवत आपल्या आघाडीला नवीन बळ दिलंय.(Latest News)

डीएमकेने राज्यातील ९ जागा दिल्या, तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुद्दुचेरीमधील एका जागा आपल्याकडे ठेवलीय. द्रमुकने तामिळनाडूमध्ये पुद्दुचेरीतील एकमेव जागा सोडून काँग्रेसला ९ जागा दिल्यात. मुख्यमंत्री स्टॅलिन आणि TNCC प्रमुख के सेल्वापेरुंथगाई यांनी AICC नेते केसी वेणुगोपाल आणि अजॉय कुमार यांच्या उपस्थितीत जागावाटप ठरवलं.

पत्रकारांना संबोधित करताना, वेणुगोपाल यांनी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी सर्व ४० जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. आणि काँग्रेस- द्रमुक यांच्यातील आघाडी कायम असल्याचं वेणुगोपाल म्हणाले. त्याआधी अभिनेता कमल हसन हे द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी द्रमुकला पाठिंबा दिला. तर डीएमकेने २०२५ च्या राज्यसभा निवडणुकीसाठी कमल हसन यांच्या मक्कल नीधी मैयम (MNM) ला एक जागा देण्याचे वचन दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT