Rahul Gandhi and Akhilesh Yadav Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election 2024: सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस यूपीत इतक्या जागा लढवणार

Rahul Gandhi and Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची बातमी समोर आली आहे.

Satish Kengar

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी संध्याकाळी 4.30 वाजता संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांमधील युतीची घोषणा करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपाने काँग्रेसला 17 जागा दिल्या आहेत. यामध्ये वाराणसी सीटचाही समावेश आहे. मात्र या जागेवर सपाने आधीच आपला उमेदवार जाहीर केला आहे. आता या उमेदवाराचे नाव मागे घेतले जाऊ शकते.

प्रियांका गांधींमुळेच सपा आणि काँग्रेसमधील चर्चा सकारात्मक झाल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी संध्याकाळी सपाची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातही इंडिया आघाडीत फूट पडल्याचं बोललं जात होतं. तसेच सपा आणि काँग्रेसमध्ये युती होणार नाही, अशी चर्चा होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातच उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रियंका गांधी यांनी स्वत: सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. यानंतर सर्व काही निश्चित झाले आणि अखिलेश यादव यांनी मुरादाबादमध्ये युती होणार असल्याची घोषणा केली.  (Latest Marathi News)

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या वतीने अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय उपस्थित राहणार आहेत. तसेच सपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल हे देखील सहभागी होणार आहेत.

दरम्यान, सपाने नुकतीच 17 जागांची यादी काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांना पाठवली होती. यामध्ये अमेठीसह रायबरेली, वाराणसी आणि अमरोहा यांचाही समावेश होता. याशिवाय कानपूर, फतेहपूर सिक्री, बसनगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, हाथरस, बाराबंकी आणि देवरिया या जागांचा समावेश करण्यात आला आहे. बुधवारी जेव्हा सपाने तिसरी यादी जाहीर केली तेव्हा त्यांनी वाराणसी आणि अमरोहा येथून आपले उमेदवार उभे केले होते. आता वाराणसीतून सपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT