pahalgam attack saam tv
देश विदेश

Pahalgam Attack: खाल्ल्या मिठाला जागले नाही! पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवली, १५ काश्मिरींनी मदत केल्याचं तपासातून उघड

OGWs Supported Pakistani Terrorists in Kashmir: एजन्सींच्या प्राथमिक तपासात, या दहशतवादी हल्ल्यात काही स्थानिक नागरिकांचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

काश्मीरचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरलंय. भारताच्या गृह मंत्रालयाने या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवली आहे. एजन्सींच्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात काही स्थानिक नागरिकांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणारे किमान १५ काश्मीरी ओव्हरग्राउंड कामगार आणि दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. या लोकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवठा आणि शस्त्रसाठा करून मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सींनी पाच मुख्य संशयिंताना पकडण्याचा प्रयत्न केला असून, त्यापैकी तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर, उर्वरीत दोन संशयितांचा शोध सुरू आहे. तपासात असेही उघड झाले आहे की, हल्ल्याच्या दिवशी हे आरोपी संबंधित भागात उपस्थित होते. तसेच त्यांचा फोन देखील सक्रिय होता. इलेक्ट्ऱॉनिक सर्व्हिलन्समध्ये या आरोपींना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संवाद साधल्याचे आढळून आले आहे.

सध्या किमान १५ ओव्हरग्राउंड वर्कर्सची चौकशी सुरू असून, पाच ओजीडब्ल्यू हल्ल्यात सक्रिय सहभागी असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी जम्मू - काश्मीर पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो, रॉ आणि एनआयएच्या संयुक्त टीम कार्यरत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या किमान १५ लोकांची यादी तयार केली आहे. हे लोक गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये रसद, अन्न आणि शस्त्र पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की पहलगाम हल्ल्यासाठी रसद पुरवठा करण्यात यांचा सक्रिय सहभाग होता. या हल्ल्यात दोन पाकिस्तानी आणि दोन काश्मिरी दहशतवाद्यांचाही समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT