प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य
जागावाटपावर सहमती न झाल्यास सर्व ४०३ जागांवर उमेदवार उतरवण्याची शक्यता
उत्तर प्रदेशात भाजपसोबतच्या जागावाटपाबाबत अद्याप औपचारिक चर्चा सुरू
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान एनडीएमध्ये संकटमोचक म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसापासून मोदींचे संकटमोचक असलेले चिराग पासवान यांनी वेगळाच राग आवळलाय. गेल्याकाही दिवसापासून बिहार सरकार आणि केंद्र सरकारलाच घरचा आहेर देत आहेत. आता तर चिराग पासवान यांनी थेट भाजपला मोठा इशारा देत सरकारचं टेन्शन वाढवलंय. चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला दबाव बनवणं सुरू केलंय.
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्पष्ट केले आहे की, २०२७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी इतर पक्षांसोबतची जागावाटपाची चर्चा यशस्वी झाली नाही. त्यांचा पक्ष (एलजेपी) राज्यातील सर्व ४०३ जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करेल. जरी हा पक्ष केंद्र आणि बिहारमधील सत्ताधारी आघाडीचा भाग असला, तरी गरज पडल्यास ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, अशी रणनीती आखलीय.
वाराणसी येथे बोलताना चिराग पासवान यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष केंद्र आणि बिहार या दोन्ही ठिकाणी एनडीए (NDA) युतीचा भाग आहे. झारखंडमध्येही त्यांचा पक्ष युतीचा भाग म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. तेथे त्यांना आपल्या उमेदवारांना आमदार म्हणून निवडून आणण्यात यशही मिळाले होते,असं चिराग पासवान म्हणाले.
पण जरी त्यांचा पक्ष केंद्रात आणि बिहारमध्ये एनडीए युतीचा भाग आहे. झारखंडमध्येही युतीचा भाग म्हणून त्यांनी काही जागा जिंकल्या आहेत. तरी नागालँडमध्ये कोणत्याही युतीत नसतानाही त्यांचे दोन आमदार आहेत. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जर कोणताही समझोता झाला नाही, तर त्यांचा पक्ष राज्यातील सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघांत स्वतःचे उमेदवार उभे करू शकतो, असा इशारा पासवान यांनी दिलाय.
चिराग पासवान यांच्या या विधानामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झालीय. त्यांचा पक्ष या राज्यात आपली पकड मजबूत करण्याची तयारी करत आहे. यासह वाराणसीमध्ये असताना त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं की, तेथील जनतेने पंतप्रधान मोदींना आशीर्वाद दिलेत , ज्यामुळे ते देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकले.
वाराणसीच्या जनतेने पंतप्रधान मोदींना या मतदारसंघातून निवडून देऊन त्यांना आपला आशीर्वाद दिलाय. जे लोक बनारसमध्ये येऊन विकासाच्या गोष्टी करतात, त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना अनेक पिढ्यांपर्यंत राज्य करण्याची संधी दिली होती. जर त्यांचा विकासाचा दृष्टिकोन खरोखरच सक्षम असता, तर आज पंतप्रधान मोदींना हे सर्व विकास उपक्रम हाती घेण्याची गरजच पडली नसती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.