Flight lightning strike SAAM TV
देश विदेश

Flight lightning strike: 17 हजार फूट उंचीवर इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली; 104 प्रवाशांमध्ये खळबळ, पुढच्या भागाचं नुकसान

lightning strike on aircraft: पटना ते लखनऊ प्रवास करणाऱ्या इंडिगोच्या विमानावर १७ हजार फूट उंचीवर वीज कोसळली. खराब हवामानातही पायलटने विमान सुरक्षितपणे लँड केलं. विमानाच्या पुढील भागाचं नुकसान झालं असून १०४ प्रवासी सुरक्षित आहेत. नंतर तांत्रिक बिघाडामुळे विमान थांबवण्यात आलं.

Surabhi Jayashree Jagdish

पटना ते लखनऊ असा प्रवास करणाऱ्या इंडिगोच्या विमानावर वीज पडल्याची घटना घडलीये. लखनऊजवळ विमान सुमारे 17 हजार फूट उंचीवर असताना ही घटना घडली. त्यावेळी परिसरात हवामान खराब होते. विमानावर वीज कोसळल्यानंतर काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

मात्र सुदैवाने या घटनेचा विमानाच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला नाही. पायलटने विमानावर नियंत्रण कायम ठेवत ते लखनऊच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे लँड केलं. या विमानात सुमारे 104 प्रवासी होते. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचं समोर आलेलं नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. पंरतु विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

वेळेआधीच विमान लखनऊत दाखल

इंडिगोचं 6E925 हे फ्लाइट पटनामधून दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी लखनऊसाठी निघालं होतं. हे विमान संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी लखनऊला पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र खराब हवामानामुळे विमानाने त्यापूर्वीच लखनऊ विमानतळावर लँडिंग केलं. सुमारे 4 वाजून 5 मिनिटांनी विमान लखनऊ विमानतळावर उतरलं.

अहमदाबादला जाणारं विमानही रखडलं

लखनऊला पोहोचल्यानंतर याच विमानाला इंडिगोच्या 6E6968 या फ्लाइटने अहमदाबादला जायचं होतं. हे फ्लाइट संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी लखनऊहून रवाना होणार होतं. मात्र विमानाची तपासणी केल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आलं. त्यामुळे विमान पुढील प्रवासासाठी वापरण्यात आलं नाही आणि ते लखनऊ विमानतळावरच थांबवण्यात आले.

प्रवाशांना जास्त त्रास होऊ नये यासाठी इंडिगोकडून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानातून संध्याकाळी सुमारे 6 वाजून 22 मिनिटांनी अहमदाबादसाठी रवाना करण्यात आले.

याआधीही इंडिगोच्या विमानावर कोसळली होती वीज

इंडिगोच्या विमानावर वीज कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी 19 जून रोजीही अशीच घटना घडली होती. जून महिन्यात तुफान सुरू असताना कोलकाता विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली होती. हे विमान अगरतळासाठी रवाना होणार होते.

वीज कोसळल्यानंतर विमानाच्या पॉवर सिस्टमवर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर विमानातील 141 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना विमानातून खाली उतरवण्यात आलं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नंतर दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. या दुसऱ्या विमानातून सर्व प्रवाशांना अगरतळाला पाठवण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळची म्हैस मुंबईच्या दावणीला; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

देशाला विरोधी पक्ष मिळाला; सत्ताधाऱ्यांविरोधातील आंदोलनाचा राहुल गांधीच चेहरा

'काव काव केल्याने कोणी कोयल होत नाही'; ठोंबरेंना सारंग यांचं प्रत्युत्तर, जागावाटपावरून राष्ट्रवादीत वाद चिघळला

काँग्रेस उद्या देशभरात 'काळा दिवस' पाळणार, इंडिया आघाडीचं दिल्लीत उद्या पुन्हा आंदोलन?

सकाळ करंडक : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तरुणाईचा नाट्याविष्कार, स्पर्धेचे वेळापत्रक वाचा

SCROLL FOR NEXT