LIC Saam Tv
देश विदेश

'एलआयसी'ची ही पॉलिसी तुम्हाला करेल मालामाल; एकदाच करावी लागणार गुंतवणूक

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सरल पेन्शन स्कीममध्ये तुम्हाला केवळ एकदाच प्रीमियम भरावे लागेल.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या एलआयसीने (LIC) सध्या ग्राहकांसाठी एक मोठी योजना जाहीर केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास ग्राहकांना चांगलाच फायदा मिळणार आहे. तुम्हाला या योजनेतून वयाच्या ६० वर्षानंतर पैसे मिळणार आहेत.

तुम्ही जर एलआयसीची पॉलिसी घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एलआयसीची सरल पेन्शन स्कीम आपल्यासाठी महत्वाची आणि फायद्याची ठकणार आहे. यात तुम्ही गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळणार आहे.

एलआयसीची (LIC) ही योजना एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम, वार्षिकी योजना आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतही या योजनेचा लाभ घेऊ शकता. (LIC Latest News)

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) लोकांच्या गरजा लक्षात घेऊन १ जुलै २०२१ रोजी सरळ पेंशन योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही एकाच वेळी पैशाची गुंतवणूक करायची आहे. यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला फिक्स इनकम मिळणार आहे.

ही पॉलिसी तुम्हाला ऑनलाइन(Online), किंवा ऑफलाइन पद्धतीने घेता येऊ शकते. या योजनेअंतर्गत, तुम्ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्जाचा लाभ घेऊ शकता. एलआयसी ( LIC) च्या सरळ पेन्शन प्लॅन पॉलिसीधारकास १२ हजार रुपये महिन्याला पेन्शन स्वरुपात मिळू शकतात. या योजनेअंतर्गत किमान वार्षिक १२ हजार रुपये प्रतिवर्ष करण्यात आली आहे. ही पॉलिसी खरेदी ग्राहकाच्या वयावर अवलंबून असणार आहे.

जर तुम्हाला महिन्याच्या पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेलतर १ हजार रुपये महिन्याला भरावे लागणार आहेत. तशाच पद्धतीने तीन महिन्यासाठी तुम्हाला ३ हजार रुपये भरावे लागणार आहेत. या पॉलिसीचा दुसरा फयदा म्हणजे ग्राहकांना आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. संबंधीत ग्राहकाच्या मृत्यूनंतर पती आणि पत्नीला आयुष्यभर पेन्शन (LIC) मिळणार आहे. (LIC Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT