Washington Post report  Saam tv
देश विदेश

... LIC कडून अदानी समूहाला ३३००० कोटी? वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात खळबळजनक दावा, VIDEO

Washington Post report : LIC कडून अदानी समूहाच्या कंपनीत ३३००० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आलाय. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला.

Vishal Gangurde

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, सरकारच्या दबावाखाली एलआयसीने ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे ३३ हजार कोटींच्या गुंतवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. 

'वॉशिंग्टन पोस्ट'मधील आरोप खोटे, निराधार असल्याचे एलआयसीने म्हटलं आहे.

अदानी समूहाने देखील गुंतवणूक निर्णय कोणत्याही सरकारी योजनेचा भाग नसल्याचे महटलं आहे. तसेच त्यांना कोणतीही विशेष सुविधा दिलेली नसल्याचे म्हटलंय.

अमेरिकेतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने अदानी समूहावर गंभीर आरोप केला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार अदानी समूहाच्या कंपनीत जवळपास ३३००० कोटी रुपयांची गुतंवणूक केल्याचा दावा 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रात करण्यात आला आहे. दुसरीकडे 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रात केलेले दावे अदानी समूहाने फेटाळून लावले आहेत.

रिपोर्टनुसार, 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रात दावा करण्यात आला आहे की, 'सरकारच्या दबावात एक योजना आखण्यात आली. त्यानंतर योजनेला संमती देण्यात आली. या आरोपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकांच्या पैशांचा दुरुपयोग होत आहे, असं म्हणत काँग्रेसने टीका केली. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेसीपी) आणि सार्वजनिक लेखा समिती (पीएसी) कडून या चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे.

या आरोपानंतर एलआयसीने एका निवेदन जाहीर करत 'वॉशिंग्टन पोस्ट'मधील आरोप निराधार आणि खोटे असल्याचं म्हटलं. कंपनीने पुढे स्पष्ट केलं आहे की, 'कंपनीच्या निर्णयावर बाह्य घटकांचा कोणताही प्रभाव पडत नाही. यात इतर कोणाची भूमिका नाही'. कंपनीने मागील काही वर्षात तपास करून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. भारतातील ५०० प्रमुख कंपन्यामधील २०१४ सालापासूनची गुंतवणूक १० टक्क्यांनी वाढली आहे. एकंदरित १.५६ लाख कोटींची गुंतवणूक आता १५.६ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. दुसरीकडे अदानी समूहाने या प्रकारच्या गुंतवणुकीचा कोणत्याही सरकारी योजनेशी संबंध नसल्याचे म्हटलं आहे.

'वॉशिंग्टन पोस्ट'चं म्हणणं आहे की, या वृत्तावर आतापर्यंत नीती आयोगाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही'. अदानी समूहाच्या कंपनीचे मालक गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले आहेत. त्यावेळी त्यांची संपत्ती जवळपास ९० अब्ज डॉलर इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT