Leech Stuck in Throat Saam TV
देश विदेश

Leech Stuck in Throat : अचानक आवाज बसला आणि घशातून रक्त येऊ लागलं; डॉक्टरांनी तपासताच समोर आलं भयंकर सत्य

Shocking News : त्यानंतर मात्र त्याला थोडी भीती वाटली. त्याने आरशात पाहिल त्यावेळी घशात काहीतरी असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली.

Ruchika Jadhav

Leech in Man Throat :

एका व्यक्तीच्या घशात जळू नावाचा किडा अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. व्हिएतनाममधील ही घटना आहे. व्यक्तीच्या घशात दुखत होतं. काही दिवसांनी रक्त देखील येऊ लागलं. त्यामुळे हा व्यक्ती डॉक्टरकडे गेला. या घटनेमुळे डॉक्टरदेखील चकित झाले. नेमका जळू किडा या व्यक्तीच्या घशात पोहोचला कसा असा प्रश्न डॉक्टरांना पडला.

घशात दुखत असल्याच्या त्रासाला व्यक्तीने किरकोळ समजून आधी दुर्लक्ष केले. पण एकदिवस अचाकन तोंडातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर मात्र त्याला थोडी भीती वाटली. त्याने आरशात पाहिल त्यावेळी घशात काहीतरी असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर समोर जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. या व्यक्तीच्या गळ्यात एक जळू अडकला होता. डॉक्टरांनी एन्डोस्कोपी केली ज्यामध्ये दिसून आलं की 6 सेंटीमीटर लांबीचा जळू त्याच्या घशात अडकला होता. श्वसनलिकेजवळील ग्लोटीसच्या खाली घट्टपणे चिकटला होता.

जळू घशात शिरला कसा?

डॉक्टरांनी विचारपूस केल्यावर त्याने निट विचार केला आणि गेल्या महिन्याभरात आपण काय काय केले ते आठवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, काही दिवसांपूर्वी उंदिर पकडताना माझ्या हाताला दुखापत झाली होती. त्यावेळी मी झाटाचा थोडा पाला तोडला आणि थोट तोंडात टाकून चघळला. त्यानंतर मी ती पेस्ट हाताला लागलेल्या जखमेवर लावली.

या सर्वांमध्ये कदाचीत पानांना लागलेला जळू किडा माझ्या घशात गेला असावा, असं त्यामे डॉक्टरांना सांगितलं. हे ऐकून डॉक्टरांनी देखील या तरुणाला ओरडा दिला. तसेच पुन्हा कधीही असे करू नये असं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

SCROLL FOR NEXT