Lebanon Pagers Blast 
देश विदेश

Lebanon Pagers Blast: लेबनॉनमध्ये सिरियल ब्लास्ट, इराणच्या राजदूतासह 1000 हून अधिक जण जखमी; खिशात पेजर्समध्ये ठेवले होती स्फोटकं

Lebanon Pagers Blast: लेबनॉनमध्ये भयानक घटना घडलीय. येथील पेजर स्फोटात 1000 हून अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये हिजबुल्लाहचे सैनिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Bharat Jadhav

लेबनॉनमध्ये सिरियल ब्लास्ट झाल्याची घटना घडलीय. येथील पेजर स्फोटात 1000 हून अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये हिजबुल्लाचे सैनिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या भयाण घटनेत इराणचे राजदूत मोजितबा अमानी हे देखील जखमी झालेत. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे.

आज दुपारी शेकडो हिजबुल्लाहाचे बंडखोर गंभीर जखमी झाल्याची माहिती लेबनॉनने दिलीय. मात्र या स्फोटात कोणाचा मृत्यू झाला याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. हिजबुल्लाहाचे सदस्य एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजर वापरत होते आणि त्याच पेजरमधून स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.

हा सीरियल ब्लास्ट दक्षिण लेबनॉन आणि राजधानी बेरूतसह अनेक ठिकाणी झाला. ही घटनेकडे हिजबुल्लाहच्या इतिहासातील सर्वात मोठी गुप्तचर त्रुटी म्हणून पाहिले जातंय. स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.४५ वाजता हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झालेत. स्फोट झाल्यानंतर तासभर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

तर या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय हिजबुल्लाह यांनी वर्तवलाय. सिरियल ब्लास्ट झाल्यानंतर लेबनान सरकारने सर्व लोकांकडे असलेले पेजर्स फेकण्यास सांगितलंय. पेजर्ससह रेडिओ आणि ट्रान्समीटरमध्येही स्फोट होऊ शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान लेबनानसह सीरियामध्येही पेजर ब्लास्ट झाल्याच्या घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. यात हिजबुल्लाहचे अनेक बंडखोर यात जखमी झालेत. जखमींना सीरियाची राजधानी दश्मिक येथील रुग्णालयात आणि त्याच्या जवळील इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्याप्रकारे हा हल्ला झाला ते पाहता असा हल्ला इतिहासात कधी झाला नव्हता असं हिजबुल्लाहकडून सांगण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Exit Poll : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : शिवाजीनगरच्या आमदारपदी सिद्धार्थ शिरोळे? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT